भारतात व्हॉट्सअ‍ॅपचा ( WhatsApp ) वापर कोट्यावधी लोकं करतात. क्वचित असा व्यक्ती असेल जो व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत नसेल. नाहीतर लहानांपासून मोठ्यापर्यंत आता प्रत्येकाकडे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. पण, अनेकदा अशी परिस्थितीत येते की, मोबाइलमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मेसेज करायला लागतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या कागदपत्राची फोटोकॉपी पाहिजे असेल आणि त्याच वेळेस त्या कागदपत्राचे फोटोच फक्त तुमच्या जवळ असतील तर तेव्हा फोटोकॉपीवाले दुकानदार कागदपत्राचे फोटो ई-मेल किंवा मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यास सांगतात. यावेळेस बऱ्याचदा आपल्याकडे समोरच्याचा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह नसतो. त्यामुळे अशावेळी अनेकजण समोरच्याचा मोबाइल नंबर सेव्ह करून त्याला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशा पद्धती सांगणार आहोत; ज्यामाध्यमातून तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवर मेसेज करू शकता. हे कसं काय? जाणून घ्या…

पहिली पद्धत

  • तुमच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  • ज्या सेव्ह नसलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करायचा आहे, तो नंबर कॉपी करा.
  • त्यानंतर न्यू चॅटचं बटण दाबा. मग तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या अंतर्गत नाव लिहा.
  • पुढे कॉपी केलेला नंबर पेस्ट करा आणि मेसेज पाठवा
  • जर ती व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपवर असल्यास तुम्हाला त्याच्याशी चॅप सुरू करण्याचा पर्याय दिसेल.

दुसरी पद्धत

  • तुमच्या ब्राउजरमध्ये जाऊन https://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx ही लिंक पेस्ट करा.
  • मग xxxxxxxxxx याच्या जागी मोबाइल नंबर टाका, देशाच्या कोडसह.
  • त्यानंतर एंटर आणि क्लिकवर दाबा.
  • या पर्यायाचा वापर करून न सेव्ह असलेल्या नंबरशी व्हॉट्सअ‍ॅप चॅट करू शकता.

तिसरी पद्धत

  • ट्रूकॉलरचा (Truecaller)  अ‍ॅप उघडा आणि फोन नंबर शोधा.
  • मग खाली जाऊन व्हॉट्सअ‍ॅप आयकॉनवर क्लिक करा.
  • त्यानंतर अ‍ॅपमधून एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटची विंडो उघडेल, तेव्हा तुम्ही मेसेज करू शकता.

चौथी पद्धत

  • तुमच्या मोबाइलमध्ये गुगल असिस्टंट अ‍ॅक्टिव्ह करा आणि म्हणा, XXX78 या नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा.
  • मग गुगल असिस्टंट तुम्हाला काय मेसेज पाठवायचा आहे, हे विचारेल.
  • त्यानंतर आपोआप तुमचा मेसेज लिहू तो संबंधित नंबरवर पाठवला जाईल.

पाचवी पद्धत

  • तुम्ही मोबाइलमध्ये सीरी शार्टकट्स घेऊन व्हॉट्सअ‍ॅप टू नॉन-कॉन्टॅक्ट डाउनलोड करा.
  • मग शॉर्टकट्स उघडा आणि शॉर्टकट्स सिलेक्ट करा. त्यानंतर नंबर टाका.
  • नंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडो उघडेल आणि थेट संबंधित नंबरवर मेसेज पाठवला जाईल.

whatsaapp
WhatsApp Messages : व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलिट केलेले मेसेज कसे वाचावेत? Android आणि iOS दोन्हीसाठी जाणून घ्या पद्धत
Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार…
Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक
national flag disrespected marathi news
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी वडापाव विक्रेत्याविरुद्ध गुन्हा
Story img Loader