How to transfer money from credit card to bank account: क्रेडिट कार्ड्स आजकाल आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. क्रेडिट कार्ड्स आपल्याला कुठेही खरेदी करण्याची परवानगी देतात, ज्यामुळे आपण वस्तू किंवा सेवा आधीच खरेदी करू शकतो आणि बँक त्यासाठीचे पैसे पेमेंट करते आणि जेव्हा आपण बँकेला दिलेल्या वेळेत त्याचे पेमेंट वेळेवर करतो, तेव्हा सगळं व्यवस्थित असतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, क्रेडिट कार्ड्स आपल्याला आणखी काय मदत करू शकतात? आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे आपल्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकता. हे कसे करता येईल हे समजून घेण्यासाठी हा लेख तुमची मदत करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर कसे करावे?
क्रेडिट कार्ड प्रदाते कॅश अॅडव्हॉन्स सुविधा देतात, ज्यामुळे व्यक्ती क्रेडिट कार्ड खात्यातून पैसे काढून ते पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतात. हे लोन घेण्यासारखं आहे, जिथे कार्ड देणारा व्यक्ती काढलेल्या किंवा ट्रान्सफर केलेल्या पैशावर व्याज ठेवतो. व्याज दर तुम्ही कॅश अॅडव्हॉन्सची परतफेड किती वेळात करता, त्यावर अवलंबून असतो.
हेही वाचा… रेल्वेचं तिकीट काढलीय, पण ऐनवेळी नाव किंवा तारीख बदलायचीय? मग ‘ही’ माहिती एकदा वाचाच
क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करू शकता?
सर्व क्रेडिट कार्ड प्रदाते क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देत नाहीत. हे करण्यापूर्वी तुम्हाला हे पाहणे आवश्यक आहे की, कार्ड देणारा प्रदाता ही सुविधा देतो का आणि अशी सुविधा उपलब्ध असल्यास, खालील स्टेप्स तुम्हाला मदत करू शकतात.
मोबाइल अॅप
जर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, तर हे ट्रॅन्झॅक्शन करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुमच्या बँकेच्या मोबाइल अॅपचा वापर.
स्टेप १ : अॅपमध्ये लॉगिन करा आणि “Add Money” किंवा “Transfer Funds” हा पर्याय शोधा.
स्टेप २ : लॉगिन केल्यानंतर “From Credit Card” हा पर्याय निवडा आणि ट्रान्सफर करायची रक्कम टाका.
स्टेप ३ : ट्रॅन्झॅक्शन तपशील तपासा आणि ट्रान्सफर कन्फर्म करा.
स्टेप ४ : ट्रॅन्झॅक्शन केल्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील.
ऑफलाइन ट्रान्सफर
एक दुसरा मार्ग म्हणजे बँकेत जाऊन पैसे ट्रान्सफर करणे.
स्टेप १ : तुमच्या क्रेडिट कार्ड प्रदात्याच्या बँकेत जा.
स्टेप २ : फंड ट्रान्सफर फॉर्म भरून सबमिट करा.
टीप : तुम्हाला महत्त्वाची माहिती देणं आवश्यक आहे, जसं की क्रेडिट कार्ड नंबर, कार्डची एक्सपायरी तारीख, बँकेचं नाव, शाखेचं नाव आणि खात्याचा नंबर.
स्टेप ३ : यानंतर बँक तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल.
एटीएम
तुम्ही जवळच्या ATM मध्ये जाऊन (शक्यतो तुमच्या क्रेडिट कार्ड प्रदात्याच्या बँकेच्या ATM मध्ये), क्रेडिट कार्डचे पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता.
स्टेप १ : तुमचं कार्ड एटीएम मशीनमध्ये टाका.
स्टेप २ : ATM स्क्रीनवर कॅश अॅडव्हॉन्स पर्याय निवडा आणि तुमच्या क्रेडिट कार्डला जोडलेले बँक खाते निवडा.
स्टेप ३ : ट्रान्सफर करायची रक्कम टाका आणि ???ट्रान्सॅक्शन??? पूर्ण करा.
टीप : तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डला जोडल्या नसलेल्या बँक खात्यातही पैसे ट्रान्सफर करू शकता, त्यासाठी तुम्हाला पैसे काढून ते तुमच्या बँक खात्यात जमा करावे लागतील.
हेही वाचा… ‘GPS’चा फूल फॉर्म तुम्हाला माहितीये का? ते कसे काम करते व त्याचा वापर काय, जाणून घ्या
क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
या सर्व गोष्टींकडे पाहता हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे की, क्रेडिट कार्डमधून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणे चांगली कल्पना नाही. जर तुम्ही क्रेडिट कार्डवरून सेवा जसे की घर कर्ज, जीवन विमा पेमेंट्स इत्यादी पेमेंट्स करू शकत नसाल, तरच पैसे ट्रान्सफर करा.
पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवा :
व्याज दर आणि शुल्क
लक्षात ठेवा की पैसे ट्रान्सफर करताना तुम्हाला ???ट्रान्सॅक्शन??? शुल्क आणि व्याज लागू शकतात. बहुतेक कार्ड प्रदाते ट्रान्सफर केलेल्या रकमेच्या १ ते ५ टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग शुल्क घेतात.
क्रेडिट लिमिट आणि उपलब्ध शिल्लक
तुमच्या क्रेडिट कार्डवर पुरेशी क्रेडिट लिमिट असली पाहिजे आणि लक्षात ठेवा की, क्रेडिट कार्डवरून पैसे ट्रान्सफर केल्याने उपलब्ध क्रेडिट लिमिट कमी होईल, जोपर्यंत तुम्ही ट्रान्सफर केलेली रक्कम परतफेड करत नाही.
सुरक्षेच्या संबंधित सावधगिरी
पैसे ट्रान्सफर करताना सुरक्षा महत्त्वाची आहे आणि फक्त विश्वसनीय आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरूनच ट्रान्सफर करा.
टीप : तुम्ही कधीही तुमचा क्रेडिट कार्ड CVV, OTP आणि PIN कोणाशीही शेअर करू नका.