How to use ChatGPT on WhatsApp : ओपन एआयने (OpenAI) नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटी जगासमोर आणले. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यापासून ते निबंध लिहिण्यापर्यंत चॅटजीपीटी खूप काही करू शकते. चॅटजीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टूल आहे. हे एक जनरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्स्फॉर्मर भाषा मॉडेल असून, ते एआयने विकसित केले आहे; जे तुम्हाला माणसाप्रमाणे उत्तरे देते. तर चॅटबॉट वापरण्यासाठी आतापर्यंत आपल्या सगळ्यांनाच ॲप डाउनलोड करावे लागायचे किंवा वेब व्हर्जनचा वापर करावा लागायचा. पण, आता तुमचे काम आणखीन सोपे होणार आहे.
आता हा चॅटबॉट व्हॉट्सअॅप (WhatsApp)वरसुद्धा उपलब्ध होणार आहे. हे नवीन इंटिग्रेशन युजर्सना वेगळे ॲप किंवा वेबसाइट न उघडता थेट व्हॉट्सअॅपद्वारे चॅटजीपीटीशी चॅट करण्याची परवानगी देणार आहे. पण, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चॅटजीपीटी व्हॉट्सअॅपवर नक्की कसे वापरायचे? तर त्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील (How to use ChatGPT on WhatsApp)…
तुम्हाला खाली इमेजमध्ये जोडलेला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करावा लागेल. तसेच हा क्यूआर कोड ओपन एआयच्या अधिकृत वेबसाइटवरदेखील उपलब्ध आहे. एकदा तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर, तुम्हाला व्हॉट्सअॅपवर रिडायरेक्ट केले जाईल, जिथे तुम्ही चॅटजीपीटीबरोबर चॅटिंग करू शकता.पण, तुम्ही अधिकृत चॅटजीपीटी अकाउंटशी संवाद साधत आहात का याची खात्री करणेसुद्धा महत्त्वाचे आहे.
तर आता हे कसे तपासायचे?
तर अधिकृत अकाउंट नावापुढे ब्ल्यू व्हेरिफिकेशन बॅज (blue verification badge ) आणि फोन नंबर 1-800-242-8478 असा असेल. ही माहिती तुम्ही बनावट नाही तर अधिकृत चॅटजीपीटीबरोबर चॅट करीत आहात याची खात्री करून देईल. एकदा तुम्ही या माहितीची पडताळणी केल्यानंतर तुम्ही तुमचे संदेश टाईप करणे सुरू करू शकता आणि चॅटजीपीटीचा आनंद घेऊ शकता.
हेही वाचा…एकच व्हॉट्सॲप नंबर दोन फोनमध्ये वापरणे शक्य आहे का? मग समजून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया
व्हॉट्सअॅपवर चॅटजीपीटी वापरणे हे मित्राशी चॅट करण्याइतकेच अगदी सोपे आहे. तुम्ही फक्त तुमचे प्रश्न किंवा विनंत्या टाईप करायचे; मग त्यावर चॅटबॉट तुम्हाला लगेच प्रतिसाद देतो. तुम्ही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे, लेखनासाठी मदत किंवा सामान्य माहिती शोधत असाल तरीही चॅटजीपीटी तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी उपलब्ध असेल. तुम्ही रोज वापरत असलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये हे पॉवरफूल एआय (AI) टूल वा सोय अनेक युजर्ससाठी गेम चेंजरसुद्धा ठरू शकते.
पण, याबाबत तुम्ही काही गोष्टी लक्षातसुद्धा ठेवल्या पाहिजेत. सध्या तुम्ही तुमचे पेड चॅटजीपीटी प्लस अकाउंट (paid ChatGPT Plus account) व्हॉट्सअॅपशी लिंक करू शकत नाही. इंटिग्रेशन प्रत्येकासाठी विनामूल्य असले तरीही तुम्ही पाठविणाऱ्या मेसेजच्या संख्येवर मर्यादा असणार आहे. तुम्ही या मर्यादा गाठल्यास, तुम्हाला एक सूचना प्राप्त होईल- ज्यांना चॅटजीपीटीचा जास्त वापर किंवा अतिरिक्त फीचर्समध्ये प्रवेश हवा असेल त्यांच्यासाठी ChatGPT ॲप किंवा वेबसाइट हा एक पर्याय आहे.
त्याचप्रमाणे ही बाब लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे की, व्हॉट्सअॅपवर उपलब्ध चॅटजीपीटीचे व्हर्जन GPT-4o मिनी मॉडेलद्वारे समर्थित आहे. हे कार्यक्षम आणि अचूक परस्परसंवाद सुनिश्चित करते. पण, ओपनएआयच्या इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या संपूर्ण GPT-4 मॉडेलच्या तुलनेत ते थोडे कमी कार्यरत आहे. असे असले तरीही चॅटबॉट क्वेरी हाताळण्यास तितकेच सक्षम आहे. त्यामुळे आत्तासाठी चॅटजीपीटी व्हॉट्सअॅपवर वापरण्याचा एक विनामूल्य आणि सोपा मार्ग ऑफर करते आहे. तसेच एआय (AI) टूल्सचा प्रयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी हा प्रयोग अगदी योग्य आहे.