Google Maps Street View: जगभरातील लोक गुगल मॅप्स ही सेवा वापरतात. गुगल मॅप्स आणि गुगल अर्थ यांच्या तंत्रज्ञानाला एकत्रित करुन गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यू हे फीचर तयार करण्यात आले. याच्या वापराने ठराविक ठिकाणावरील तेथील रस्ते, आजूबाजूचा परिसर व्यवस्थितपणे पाहता येतो. यामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता तेथील परिसराचा आढावा घेता येतो. २००७ मध्ये हे फीचर लॉन्च करण्यात आले होते. सुरुवातीला अमेरिकेतील काही राज्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. आता याचा वापर जगभरात केला जात आहे.
या यूनिक फीचरमध्ये Google maps चा वापर करताना रस्त्यावरील प्रत्येक भाग पॅनोरामा अॅंगलमध्ये पाहायला मिळतो. एखाद्या अनोळख्या जागी जाण्यासाठी या टूलचा वापर करणे फार उपयुक्त ठरु शकते. याचा वापर सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक व्यवसायांमध्ये गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचे पाहायला मिळतो. शहरी संशोधन, नियोजन अशा कामांमध्येही याची मदत होऊ शकते.
चला तर मग Google Maps Street View कसे वापरावे हे जाणून घेऊयात.
- Google maps स्मार्टफोनमध्ये उघडा.
- एखाद्या जागेवरवर पीन करा किंवा लोकेशनमध्ये पत्ता टाइप करा.
- त्यानंतर ती जागा पाहण्यासाठी स्क्रीनच्या खालच्या बाजूला त्या जागेच्या नावावर टॅप करा.
- खाली स्क्रोल करा आणि Street View image लिहिलेल्या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता ती जागा पॅनोरामा मोडमध्ये पाहायला मिळेल. बॅक बटणावर टॅप करुन तुम्ही होमपेजवर जाल.
लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर गुगल मॅप वापरत असल्यास –
- Google maps असे सर्च करुन नवीन विंडो उघडा.
- नकाशावरील एक ठिकाण निवडा.
- 360-degree view असे स्क्रीनच्या खालच्या बाजूला लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
- होम पेजवर परतण्यासाठी बॅक बटण टॅप करा.