– डॉ. माला कनेरिया (सल्लागार संसर्गजन्य रोग, जसलोक रुग्णालय व संशोधन केंद्र)

सॅनिटायझर्सच्या फायद्यांव्यतिरिक्त, आपण हे हि सुनिश्चित केले पाहिजे की सॅनिटायझर्सच्या अति प्रमाणात वापरामुळे देखील नुकसान होऊ शकते. जास्त अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरणे किंवा वारंवार हात धुण्यामुळे उलट परिणामही होऊ शकतो. जास्त धुण्यामुळे हात कोरडे होऊ शकतात, भेगा (क्रॅक) पडू शकतात आणि रक्तस्त्राव सुरु होऊ शकतो. ज्यामुळे जंतू शरीरात प्रवेश करू शकतील आणि शरीरासाठी धोकादायक असू शकतात. अशा इतर समस्या उद्भवू शकतात.

-सॅनिटायझर कधी वापरावे? प्रत्येक व्यक्तीने हे खात्री केले पाहिजे की खाण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुवावेत. कामाच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालयातून घरी आल्यानंतर आपले हात, पाय आणि चेहरा स्वच्छ धुवावेत. याव्यतिरिक्त, लोकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे आणि त्यांनी ते केल्यास स्वच्छतेच्या मूलभूत सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत.

– सॅनिटायझर्सच्या अत्यधिक वापरामुळे इतर कोणता आजार उद्भवू शकतो का? सॅनिटायझर्सचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्वचेला हानी पोहचू शकते कारण यामुळे त्वचेला भेगा पडू शकतात (क्रॅकिंग) होऊ शकते आणि कोरडेपणा येऊ शकतो.  हाताच्या सर्व पृष्ठभागावर पुरेसे सॅनिटायझर वापरा आणि कोरडे २० सेकंदांपर्यंत हात चोळा. जर हात मृदू असतील, तर साबण आणि पाण्याचा वापर करून हाताने २० सेकंद धुवा.

– कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी सर्वात प्रभावी फेस मास्क कोणता आहे? सर्जिकल (प्रक्रियात्मक किंवा तिहेरी-स्तरित मुखवटा) एखाद्या व्यक्तीला कोविड १९ संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीची आणि त्याची काळजी घेत असलेल्यांनी परिधान केला पाहिजे. याव्यतिरिक्त, ज्या लोकांना सर्दी आणि खोकला आहे त्यांनी बाहेर जाताना किंवा लोकांच्या संपर्कात जात असाल तर तेव्हा त्यांनी मास्क घालणे गरजेचे आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. एन ९५ चे मास्क फक्त आरोग्य सेवा देणार्या कर्मचाऱ्यांसाठीच दिले जाण्याची शिफारस केली जात आहे. मास्क केवळ तेव्हाच उपयुक्त असतात जेव्हा अल्कोहोल-आधारित हँड रब (ज्यामध्ये ६०% अल्कोहोल असते) किंवा साबण आणि पाण्याने वारंवार हात स्वच्छ करण्याच्या संयोजनात वापरले जात असेल. मास्क लावण्यापूर्वी, अल्कोहोल आधारित सॅनिटायझर्स किंवा साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ करा. मास्कचा पुढील भागास स्पर्श करू नका. मास्क आणि चेहरा यांच्यात कोणतेही अंतर नाही याची खात्री करा. ६ ते ८  तासांनंतर किंवा जेव्हा ओलसर होईल तेव्हा मुखवटा बदला आणि संभाव्यत: संसर्गजन्य असल्याने त्याची काळजीपूर्वक विल्हेवाट लावा.

 

Story img Loader