UPI Services On Whatsapp : घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेक कामे करणे शक्य होतात. त्यामुळे मेटा कंपनी युजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी नेहमी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असतात. व्हॉट्सअ‍ॅप काही महिन्यांपूर्वी भारतीय वापरकर्त्यांसाठी यूपीआय (UPI) पेमेंटसारखी एक नवीन सेवा घेऊन आली, ज्याचे नाव व्हॉट्सअ‍ॅप पे (WhatsApp Pay) असे आहे.

तर, आता व्हॉट्सअ‍ॅप पे (WhatsApp Pay) मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या पेमेंट फीचर्सने, भारतातील त्यांच्या युजर्ससाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा रोल आउट करण्याची परवानगी दिली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅप पेसाठी युजर्सच्या ऑन बोर्डिंगवरील मर्यादा काढण्याचा निर्णय जाहीर केला.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच

अधिकृत निवेदनात, NPCI ने घोषणा केली आहे, “नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्हॉट्सअ‍ॅप पे (थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर)साठी यूपीआय युजर्सची मर्यादा तत्काळ काढून टाकली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप कंपनी त्यांची यूपीआय सेवा ‘व्हॉट्सॲप पे’ भारतातील सर्व युजर्स उपलब्ध करू शकणार आहेत. व्हॉट्सॲप पे सेवांचा विस्तार करण्याच्या निर्णयामुळे भारतातील व्हॉट्सॲपच्या ५०० दशलक्ष युजर्सना फायदा होईल. यापूर्वी सुमारे १०० दशलक्ष व्हॉट्सॲप युजर्सद्वारे ही सेवा वापरण्यापर्यंत प्रतिबंध करण्यात आला होता.

व्हॉट्सअ‍ॅप पे (WhatsApp Pay) कसे वापरायचे?

  • तुम्ही आता व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंटशी लिंक केलेले बँक खाते वापरून, उत्पादने किंवा सेवांसाठी व्यापाऱ्यांना पैसे देऊ शकता.
  • चॅटमध्ये payment request आल्यावर तुमच्या ऑर्डरसाठी पैसे भरा.
  • पे विथ यूपीआयवर टॅप करा. रिव्हिव्ह (Review) करा आणि पैसे द्या.
  • तुमची ऑर्डर Review करा. त्यानंतर Continue वर टॅप करा
  • तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर आधीच पेमेंट्स (payments ) सेट केले असल्यास, तुम्ही पैसे देण्यासाठी लिंक केलेले बँक खाते निवडू शकता.
  • तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट सेट केले नसल्यास, व्हॉट्सअ‍ॅपवर Pay सिलेक्ट करा. Continue निवडा. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट सेट करण्यासाठी आपोआप रिडायरेक्ट केले जाईल
  • पेमेंटबद्दलची माहिती नीट वाचा किंवा तपासा. नंतर ‘पेमेंट पाठवा’वर टॅप करा.
  • पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुमचा यूपीआय पिन एंटर करा.
  • व्यापाऱ्याबरोबरच्या चॅटमध्ये तुम्हाला पेमेंट पूर्ण झालेले दिसेल. तुम्ही व्यापाऱ्याशी थेट तुमच्या चॅटमध्ये किंवा तुमच्या पेमेंट होम पेजवरून ऑर्डर स्थितीचा मागोवा घेणे सुरू ठेवू शकता.

हेही वाचा…Fixed Deposit : तुम्ही किती फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडू शकता? फक्त ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, आर्थिक नुकसानही होणार नाही

जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच करण्यात आले तेव्हा NPCI ने सुरक्षा आणि प्लॅटफॉर्म भारताच्या मोठ्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टीमच्या मागण्यांचे व्यवस्थापन करू शकेल का याची खात्री करण्यासाठी युजर्सच्या संख्येवर मर्यादा लादल्या होत्या. सुरुवातीला यूपीआय युजर्सपैकी फक्त काही टक्के लोकच या सेवेत प्रवेश करू शकत होते. पण, आता NPCI ने कॉम्पलिअन्स आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेचे (compliance and operational efficiency) निरीक्षण केल्यामुळे मर्यादा वाढवण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत युजर्सची मर्यादा १०० दशलक्षपर्यंत वाढवण्यात आली होती आणि त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप पेला त्याची सिस्टीम सुधारण्याची आणि स्केलेबिलिटी, सुरक्षा समस्यांमध्ये सुधारणा करण्याची परवानगी दिली.

NPCI द्वारे ही सुधारणा का करण्यात आली ?

कॅप काढून टाकण्याचा निर्णय NPCI च्या मूल्यांकनानुसार करण्यात आला आहे, व्हॉट्सअ‍ॅप पेने युपीआय पेमेंट सेवांसाठी आवश्यक सर्व ऑपरेशनल, सुरक्षा, कॉम्पलिअन्स स्टॅण्डर्ड्सची पूर्तता केली आहे. हे पाऊल डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर प्रवेश सक्षम करून कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी भारताच्या प्रयत्नाशी सुसंगत आहे. आता हा अॅक्सेस एक्स्पांड (विस्तारित) केला असला तरीही ‘व्हॉट्सअ‍ॅप पे’ने थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर्स (TPAP) UPI ​​मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सुरू ठेवले पाहिजे.

भारताच्या यूपीआय इकोसिस्टीमवर परिणाम

देशातील ४०० दशलक्षांहून अधिक व्हॉट्सॲप युजर्ससह हे अपडेट भारताच्या यूपीआय इकोसिस्टीमला आकार देण्यासाठी आणि यूपीआय व्यवहारांवर वर्चस्व असलेल्या यूपीआय, पेटीएम, गूगल पे व फोन पे यांसारख्या इतर यूपीआय ॲप्सशी व्हॉट्सअ‍ॅप स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.

मार्केट कॅपची (market cap) मुदत वाढवणे

पूर्वी २०२१ मध्ये जारी केलेल्या नियमानुसार, कोणत्याही एका यूपीआय ॲपला एकूण व्यवहारांपैकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हाताळण्याची परवानगी नव्हती. पण, NPCI ने आता दोन वर्षांनी पालन करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे.

Story img Loader