IC 814 – The Kandahar Hijackers Real Names : अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४: कंदहार हायजॅक’ या नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजची बरच चर्चा होत आहे. गेल्या आठवड्यात (२९ ऑगस्ट) ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, अरविंद स्वामी, पत्रलेखा आणि अभिनेता विजय वर्माने या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २४ डिसेंबर १९९९ रोजी पाकिस्तानमधील पाच दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सचं एक विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीसाठी उड्डाण केल्यानंतर ४० मिनिटांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांनी ते विमान अमृतसर, लाहोर, दुबई असा प्रवास करून कंदहारला नेलं होतं.

विमान अपहरणाची घटना भारतीय गुप्तचर यंत्रणेचं मोठं अपयश मानलं जातं. विमानाचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी आणखी एक पाऊल पुढे जाऊन भारत सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं. अपहरणकर्त्यांनी विमानातील प्रवासी व क्रू सदस्यांना आठ दिवस ओलिस ठेवलं होतं. विमानातील प्रवाशांना मुक्त करण्याच्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे दहशतवादी मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या तीन दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. भारत सरकारला ही मागणी मान्य करावी लागली. प्रवासी व विमानाच्या बदल्यात तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंह हे त्या दहशतवाद्यांना विशेष विमानाने कंदहारला घेऊन गेले. तिथे ओलिस ठेवलेले प्रवासी व क्रू आणि अतिरेकी यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली. या घटनेवर आधारित ‘आय सी ८१४: कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज असून २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
ats arrested accused for forging Aadhaar and pan cards for Bangladeshi infiltrators
बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देणाऱ्यांना एटीएसकडून अटक, तीन बांगलादेशी नागरिकांसह सात जणांना अटक
Mira Road, Bangladesh nationals arrested ,
सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक
Saif Ali Khan attack case Diamond ring stolen by attacker while working in pub
सैफ अली खान हल्ला प्रकरण : पबमध्ये कामाला असताना हल्लेखोराकडून हिऱ्याच्या अंगठीची चोरी
Saif Ali Khan, house accused , Saif Ali Khan latest news,
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या घराला आता टाळे
Saif ali khan, accused who attacked Saif ali khan,
Saif Ali Khan Latest News : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईत नेमका कुठे वास्तव्याला?

हे ही वाचा >> ‘भाभीजी घर पर है’ फेम मराठामोळी शिल्पा शिंदे ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी होणार? चर्चांना उधाण

दरम्यान, या वेबसीरिजमधील दहशतवाद्यांच्या नावावरून मोठा वाद उफाळून आला आहे. या वेबसीरिजमध्ये दहशतवाद्यांची नावे शंकर आणि भोला अशी ठेवण्यात आली आहेत. हे पाहिल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी नेटफ्लिक्स व वेबसीरिज बनवणाऱ्या लोकांवर संताप व्यक्त केला आहे. वेबसीरिजच्या निर्मात्यांनी एका विशिष्ट समुदायाशी संबंधित दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांची नावे बदलून शंकर आणि भोला अशी ठेवली असल्याचा आरोप होत आहे.

अपहरणकर्त्यांनी खरंच कोडनेम वापरली होती का?

काही लोकांनी नेटफ्लिक्सवर बॉयकॉट नेटफ्लिक्स, बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट आय सी ८१४ असे हॅशटॅग वापरून रोष व्यक्त केला आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोपही केला आहे. खरंतर अपरहणकर्त्यांनी हा कटादरम्यान एकमेकांसाठी विशिष्ट नावं (कोडनेम) वापरली होती. ते एकमेकांना बर्गर, डॉक्टर, चीफ, भोला व शंकर या नावांनी हाक मारायचे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या वेबसीरिजमध्ये हीच नावं वापरली आहेत.

हे ही वाचा >> “भोला, शंकर…”, अशी दहशतवाद्यांची नावे बदलल्याने ‘आय सी ८१४: कंदहार हायजॅक’वर नेटकऱ्यांचा आक्षेप; म्हणाले, “तथ्यांचा…”

दरम्यान, या विमान अपहरणातून बचावलेल्या अनेक प्रवाशांनी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या दाव्यांना दुजोरा दिला आहे. तसेच सीरिजमध्ये दाखवलेली नावे खरी असल्याचंही ठामपणे सांगितलं आहे. अपहरणकर्त्यांची खरी नावं व त्यांन या कटादरम्यान वापरलेली कोडनेम खालीलप्रमाणे…

दहशतवाद्याचं नाव – कोडनेम

इब्राहिम अथर – चीफ
शाहिद अख्तर – डॉक्टर
सनी अहमद काझी – बर्गर
झहूर इब्राहिम – भोला
सय्यद शाकीर – शंकर

Story img Loader