इडली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती तिची चंद्राप्रमाणे दिसणारी आकृती. इडली आणि चटणी किंवा इडली-सांबार या न्याहारीने अनेकांचा दिवस सुरु होतो. पचायला हलकी, चटणीबरोबर रुचकर लागणारी इडली अनेकांना आवडते. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाची आवडती ही इडली आहे. आपल्याला वाटतं की ही इडली दक्षिणेतून आपल्याकडे आली आहे. मात्र १३ व्या शतकात महाराष्ट्रात इडली तयार होत होती. तेलकट नसल्याने आणि हलकी फुलकी असल्याने ती सगळ्यांनाच आवडते. मात्र इडलीचा इतिहास फारच मोठा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कहाणी शब्दांची या पुस्तकात काय उल्लेख?

सदानंद कदम लिखित ‘कहाणी शब्दांची’ यातल्या उल्लेखानुसार १३ व्या शतकापासून महाराष्ट्रात इडली तयार होते आहे. सदानंद कदम म्हणतात, इडली हा पदार्थ दक्षिणेतून आपल्याकडे आला असा समज असला तरीही तेराव्या शतकातील ऋद्धीपूरवर्णात इडलीची नोंद आहे. पूर्णचंद्राचा अनुकारी.. चोखाळपणे भजिजे इडली. असा उल्लेख असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. उडीद आणि तांदूळ यांचं पीठ आंबवून इडली तयार होते. या पदार्थाचं मूळ नाव इड्डली. कानडीत इड्डुरिया म्हणजे मिष्टान्न. तर उडीद, तांदूळ, दही, जिरे, हिंग आणि मिरे घालून तयार करण्यात येणाऱ्या इडलीचं कानडी नाव आहे इड्डुलिगे. असा उल्लेख कहाणी शब्दांची या पुस्तकात आहे.

केटी अचिंया यांच्या पुस्तकात काय उल्लेख?

खाद्य इतिहासकार केटी अचिंया यांच्या ‘इंडियन फूड अ हिस्टॉरिकल कम्पॅनियन’ यातल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे कन्नड कवी शिवकोटी यांच्या कवितेत इसवी सन पूर्व ९२० मध्ये इडलीचा उल्लेख आढळतो. पांथस्थांची भूक भागवण्यासाठी १८ विविध घटकांपैकी एक असलेला इडली हा घटक असल्याचंही त्यात म्हटलं आहे. तामिळनाडूत १७ व्या शतकात मच्छपूर्णममध्ये इटली असा इडलीचा उल्लेख आढळतो.

इडलीचे भारतात उपलब्ध प्रकार किती आहेत?

रवा इडली
राईस इडली
मिनी इडली
थट्टे इडली
स्टफ इडली
कांचीपुरम इडली
शेजवान इडली
इडली चिली
फ्राय इडली
मसाला इडली

या प्रकारांमध्ये इडली भारतात मिळते. नागलीपासून तयार करण्यात येणाऱ्या इडल्याही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही खाद्य इतिहासकारांच्या मते इडली ही इंडोनेशियातून भारतात आली आहे.

इडलीबाबत काही रंजक माहिती

इडली भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये न्याहरीसाठी उत्तम पदार्थ मानली गेली आहे.

ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी इडली हा एक उत्तम आहार आहे. कारण इडलीमुळे पोट भरतं आणि तळकट पदार्थ किंवा ब्रेड यांच्या तुलनेत इडलीत कॅलरीजही कमी असतात.

सध्या भारतात इडली ही दाक्षिणात्य पदार्थ म्हणून ओळखली जाते.