Earthquake : तुर्कस्तानमध्ये भूकंप आल्याने हाहाकार उडाला. भूकंपामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशातही प्रत्येक वर्षी कमीत कमी १००० वेळा भूकंप येतो. आपल्या देशाचाही जवळपास ५८ टक्के भाग भूकंपाच्या तीव्र झोनमध्ये येतो. सर्वात जास्त धोका हिमालय क्षेत्रात असतो. इथे यापूर्वीही मोठे भूकंप आले आहेत. या भागात नेहमी मध्यम ते तीव्र स्तराचे भूकंप येतात. कारण या क्षेत्रातील जवळपास दोन मोठ्या महाद्विपांची टेक्टोनिक प्लेट मिळते. इथे इंडियन टक्टोनिक प्लेट आणि तिब्बतन प्लेट एकमेकांना टक्कर देऊन प्रेशर रिलीज करतात. ज्यामुळे भूकंप येतो. याच्या जवळ असलेल्या २४०० किमीच्या भागात सर्वात जास्त धोका असतो.
५ झोनमध्ये देशाची विभागणी
भारतीय मानक ब्युरोने (BIS) देशाला पाच वेगवेगळ्या भूकंपाच्या झोनमध्ये विभागलं आहे. पाचव्या झोनमध्ये येणाऱ्या परिसराला सर्वात मोठा धोका असल्याचं बोललं जातं. या झोनमध्ये येणाऱ्या राज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचं शक्यता असते. अशाप्रकारे पाचव्या ते पहिल्या झोनला कमी धोका असतो. जाणून घेऊयात कोणत्या झोनमध्ये देशातील कोणकोणते राज्य येतात.
Earthquake Zone 1
या झोनमध्ये येणाऱ्या विभागांना कोणताच धोका नसतो.
Earthquake Zone 2
या झोनमध्ये राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूचा काही भाग येतो.
Earthquake Zone 3
या झोनमध्ये केरळ, गोवा, लक्षद्विप समूह, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा काही परिसर, गुजरात आणि पंजाबचा परिसर, पश्चिम बंगालचा काही भाग, पश्चिमी राजस्थान, मध्यप्रदेश, बिहारचा काही भाग, झारखंडचा उत्तर भाग आणि छत्तीसगढचा काही भाग येतो. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग या झोनमध्ये येतो.
Earthquake Zone 4
या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, लडाख, हिमाचल, आणि उत्तराखंडचा काही भाग, सिक्किम, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशचे उत्तरी भाग, बिहार आणि पश्चिम बंगालचा काही भाग, गुजरात, पश्चिम भागातील महाराष्ट्राचा काही भाग आणि पश्चिमी राजस्थानचा छोटा परिसर येतो.
सर्वात खतरनाक आहे Zone 5
सर्वात खतरनाक म्हणजेच पाचव्या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीरचा काही हिस्सा (कश्मीर घाटी), हिमाचल प्रदेशचा पश्चिम विभाग, गुजरातचा कच्छ, उत्तराखंडचा पूर्व विभाग, भारताचे सर्व पूर्वोत्तर राज्य, अंदमान आणि निकोबार द्वीप समुहाचाही समावेश आहे.
कोणत्या झोनमध्ये देशाचा किती भाग आहे?
सर्वात खतरनाक म्हणजे पाचव्या झोनमध्ये देशाच्या एकूण जमिनीचा ११ टक्के हिस्सा आहे. तर चौथ्या झोनमध्ये १८ टक्के जमिन येते. तिसऱ्या आणि दुसऱ्या झोनमध्ये ३० टक्के जमीन येते. सर्वात जास्त धोका चौथ्या आणि पाचव्या झोनच्या राज्यांना आहे.