आपण सगळेचजण स्मार्टफोन वापरतो. स्मार्टफोन हा आजच्या काळातील लोकांची मुख्य गरज बनला आहे. आपली अनेक कामे या स्मार्टफोनच्या मदतीने आपण करत असतो. स्मार्टफोनच्या मदतीने एकमेकांशी संवाद साधू शकतो. एकमेकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो. रेल्वे, बस, विमान , पिक्चर यांची तिकिटे आणि असंख्य कामे आपण स्मार्टफोनच्या मदतीने करू शकतो. आपण आपला स्मार्टफोन अगदी काळजीपूर्वक हाताळत असतो. त्याला काही होणार नाही किंवा त्याला स्क्रॅच येऊ नयेत म्हणून आपण बॅक कव्हर तसेच डिस्प्लेवर ग्लास बसवतो जेणेकरून तुमचा मोबाईल सुरक्षित राहावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण दिवसभर स्मार्टफोन हाताळत असतो. त्यामुळे तो लवकर घाण होण्याची शक्यता असते. तुमचा फोन नेहमी तुमच्याजवळ असतो मात्र कमी प्रमाणात लोकं त्याच्या स्वछ्तेबाबत काळजी घेत नाहीत. जेव्हा कधीही आपल्याला आपला फोन स्वच्छ करायचा असतो तेव्हा आपण घातलेल्या कपड्यांवरच घासून तो साफ करतो. मात्र अनेकजणांना हे माहिती नसते की तो नीट साफ केला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. तर आज आपण फोन कसा स्वच्छ करावा हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : ChatGPT बाबत Google Search चे प्रमुख प्रभाकर राघवन यांचे मोठे विधान; म्हणाले…

तुम्ही कायम तुमचा स्मार्टफोन किंवा टॅबची टचस्क्रीन स्वच्छ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापडाचा वापर केला पाहिजे. हे कापड खूप मऊ असते त्यामुळे स्क्रीनवर स्क्रॅच पडत नाहीत. सामान्य कापडापेक्षा या कापडामध्ये खूप मुलायम असे तंतू असतात.

तसेच स्मार्टफोन साफ करण्यासाठी लोकं टूथपिक , पिन यांसारख्या धारदार , टोकदार वस्तूंचा वापर करतात. लोकं या वस्तू फोनच्या जॅकमध्ये घालतात. असे केल्यामुळे स्मार्टफोनचा तो पार्ट किंवा पूर्ण स्मार्टफोनचं खराब होऊ शकतो. त्यामुळे अशा वस्तूंचा वापर मोबाईल साफ करण्यासाठी करू नये.

स्मार्टफोनची स्क्रीन साफ करत असताना नेहमी काळजी घेणे आवश्यक आहे. स्क्रीन साफ करताना कापड हे खालून वरपर्यंत ते वरपासून खालपर्यंत अशा स्वरूपात स्वच्छ करू नये. अशामुळे स्क्रीनमध्ये पाणी किंवा ओलावा जाण्याची भीती असते. कापड हे नेहमी स्क्रीनवर गोल-गोल फिरवून स्वच्छ केले तर चांगले होईल आणि फोनच्या स्क्रीनला कोणत्याही प्रकारचे स्क्रॅच पडणार नाहीत किंवा त्यात पाणी जाणार नाही.

हेही वाचा : ChatGPT बाबत Google Search चे प्रमुख प्रभाकर राघवन यांचे मोठे विधान; म्हणाले…

स्मार्टफोन स्वच्छ करत असताना पाण्यावर आधारित लिक्विड क्लिनर कधीही वापरू नये. हे तुमच्या फोनची स्क्रीन खराब करू शकतात त्यामुळे तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतात. स्क्रीन साफ करण्यासाठी कधीही हाय केमिकल किंवा पाण्याचा वापर करू नका. शक्य असल्यास बाजारात उपलब्ध असलेले टेस्टिंग केलेलं लिक्विड क्लिनर खरेदी करून तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन साफ करा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you not careful while cleaning smartphone can damage phone and damage your smartphone tmb 01