Insurance Over Natural Disaster : बिपरजॉय वादळाने देशाच्या विविध भागात हाहाकार माजवला आहे. या चक्रवादळामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेगवान वारे आणि वादळी पावसामुळे तुमची कार खराब होऊ शकते. तसंच इंजिनचंही नुकसान होऊ शकतं. इंजिनमध्ये पाणी भरू शकतं. जर वादळामुळे तुमची कार खराब झाली, तर तुम्ही काय करू शकता?

नैसर्गिक आपत्तीमुळे तुमची गाडी खराब झाल्यानंतर विमा मिळवण्यासाठी तुम्ही क्लेम करू शकता. अनेक कंपन्या आहेत, ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गाडी खराब झाल्यानंतर व्हेईकल इन्श्यूरन्स देतात. बिपरजॉय वादळात खराब झालेल्या गाड्यांसाठी या याचा वापर तुम्ही कसं करु शकता, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक कंपन्या देतात चक्रीवादळाचा विमा

हवामानात बिघाड झाल्याने किंवा वादळी पावासामुळे गाडी खराब झाल्यावर अनेक कंपन्यांकडून मोटर इन्श्यूरन्स दिला जातो. अशातच तुमची कार या वादळामुळे खराब झाली असेल, तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाहीय. तुमच्या कारला दुरुस्त करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण काही नियम व अटींनुसार तुम्ही विमा कंपनीकडून डॅमेज क्लेम करू शकता. यासाठी जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा व्हेईकल इन्शूरन्स पॉलिसीत मिळणाऱ्या कवरला समजून घेणं आवश्यक आहे.

नक्की वाचा – कुणी घर देतं का घर? मुंबईत घर शोधताना मुस्लीम तरुणीला करावा लागला संघर्ष, मित्र ट्वीटरवर म्हणाला, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे…”

पॉलिसी घेण्याआधी किती प्रीमियम भरावा लागेल, हे तपासा

व्हेईकल विमा किंवा मोटर इन्श्यूरन्स घेताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की कंपनी कोणत्या गोष्टींचा कव्हर देत आहे. याचसोबत तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे व्हेईकल डॅमेजसाठी किती प्रीमियम भरावं लागेल, यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व मोटार विमा पॉलिसीसोबत तुलना करूनच निर्णय घ्या. पॉलिसीत आधीच दिल्या जाणाऱ्या डॅमेज कव्हरच्या फायद्याचीही खात्री करून घ्या. कारण कोणतंही आवश्यत कव्हर राहता कामा नये.

नो क्लेम बोनसचाही मिळतो फायदा

जर तुमची गाडी बिपरजॉय वादळात डॅमेज झाली असेल. तर तुम्ही एक क्लेम केल्यानंतर दुसराही क्लेम करू शकता. यासाठी जर तुम्ही गाडीचा विमा बोनस प्रोटेक्शन कवर जोडलं असेल, तर विमाच्या कालावधीदरम्यान एका क्लेमचा लाभ घेण्याऐवजी तुम्ही No Claim Bonus च्या माध्यमातून याचा फायदा घेऊ शकता. म्हणजेच गाडीचा नवीन इन्श्यूरन्स करत असताना तुम्हाला कमी प्रीमियम भरावं लागतं.

Story img Loader