Indian Railway Rules: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे झाले आहे. रेल्वेतून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेमध्ये प्रवास करताना फोन वापरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. अनेकदा लोक टाईमपास करण्यासाठी फोन वापरतात. मात्र अनेक वेळा मोबाईल फोन किंवा पर्स इत्यादी महत्त्वाच्या वस्तू रेल्वे रुळावर पडतात. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात. आजकाल फोन खूप महत्त्वाची वस्तू झाला आहे. अनेकदा लोक बँकिंग माहितीपासून ते आयडीपर्यंतची सर्व माहिती फोनमध्येच सेव्ह करून ठेवतात. अशा परिस्थितीत मोबाईलशिवाय अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पर्समध्ये देखील पैसे किंवा महत्त्वाचे कागदपत्रे असू शकतात. एकंदर महत्वाचे सामान चालत्या रेल्वेतून पडल्यास ते परत मिळविण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. या नियमांचे पालन करून तुम्ही तुमचा हरवलेला फोन किंवा पर्स परत मिळवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चुकूनही रेल्वेची साखळी खेचू नका

अनेकदा मोबाईल फोन रेल्वे रुळावर पडला की, रेल्वे थांबवण्यासाठी लोक साखळी खेचतात. परंतु हा दंडनीय गुन्हा असल्याने तसे करणे टाळले पाहिजे. तुम्हाला दंड आणि एक वर्ष तुरुंगवास किंवा दोन्हीही होऊ शकते. रेल्वेच्या नियमांनुसार, साखळी खेचणे केवळ आणीबाणीच्या परिस्थितीतच करता येते . सामान पडल्यास किंवा स्थानकावर राहिल्यास प्रवाशांना साखळी खेचता येत नाही. आता अशा स्थितीत प्रवाशांना त्यांचे सामान परत मिळण्याचा मार्ग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : IRCTC Sick Rules: धावत्या रेल्वेमध्ये प्रवासी आजारी पडल्यास उपचार कसे मिळवावे? जाणून घ्या सविस्तर

मोबाईल फोन कसा मिळवायचा

जर तुमचा मोबाईल फोन किंवा पर्स रेल्वे रुळावर पडली असेल तर सर्वप्रथम रुळाच्या बाजूला असलेल्या खांबावर पिवळ्या आणि काळ्या रंगात लिहिलेला क्रमांक नोंदवा. यानंतर, तुमचा फोन कोणत्या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान पडला आहे ते शोधा. यासाठी तुम्ही टीटीई किंवा इतर प्रवाशांच्या मोबाईल फोनची मदत घेऊ शकता. यानंतर, रेल्वे पोलिस दलाच्या हेल्पलाइन क्रमांक १८२ किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर कॉल करून, तुमचा मोबाइल फोन किंवा सामान गायब झाल्याची माहिती द्या.

या दरम्यान तुम्ही तुमच्या पोल नंबरची माहिती आरपीएफला द्यावी. या माहितीमुळे रेल्वे पोलिसांना त्यांचा माल शोधणे सोपे होणार आहे. यासोबतच तुमचा मोबाईल फोन मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. यानंतर, पोलिस तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतील आणि तुमचा मोबाईल फोन जमा करतील. पोलिस केवळ तुमचे सामान मिळविण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात ठेवा. जर तुमचा मोबाईल कोणी उचलून नेला असेल तर तुम्हाला तो परत मिळू शकणार नाही.

हेही वाचा : IRCTC: संपूर्ण रेल्वेगाडी किंवा डब्याचे आरक्षण करता येते का? त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारतात का? जाणून घ्या

तुम्ही अर्लाम साखळी कधी ओढू शकता

महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे स्थानकावर एखादे लहान मूल किंवा वृद्ध व्यक्ती मागे राहिल्यासच तुम्ही रेल्वेची अर्लाम साखळी ओढू शकता. दुसरीकडे, अपंग व्यक्तीने रील रेल्वे स्थानकावर मागे राहिला असेल आणि रेल्वे सुरू झाली असेल, तर अशा परिस्थितीत साखळी खेचता येते. याशिवाय रेल्वेमध्ये आग, दरोडा किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतच साखळी खेचण्याला परवानगी आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If your mobile or purse falls from a moving train do this immediately your luggage can be returned quickly snk