IMDb Ratings : गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी माध्यमांचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ओटीटी अ‍ॅप्सवर दर आठवड्याला विविध कलाकृती प्रदर्शित केल्या जातात. जवळपास प्रत्येक टेलिव्हिजन वाहिन्यांनी आपले स्वतंत्र ओटीटी अ‍ॅप्स देखील सुरू केले आहेत. याशिवाय थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट सुद्धा काही काळाने ओटीटीवर प्रदर्शित होतात, त्यामुळे ओटीटीवर प्रत्येक भाषेतील विवध प्रकारचा कंटेट उपलब्ध असताना नेमकं काय पाहायचं असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अशावेळी अलीकडच्या काळातील तरुणपिढी लगेच संबंधित सीरिज, चित्रपट अथवा टीव्ही शोला IMDb रेटिंग किती आहे याची पडताळणी करते.

आयएमडीबी ( IMDb ) म्हणजे काय?

आयएमडीबी म्हणजेच ‘इंटरनेट मूव्ही डेटाबेस’. IMDb हा सध्याच्या मनोरंजनविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असा मीडिया डेटाबेस आहे. याठिकाणी सिनेप्रेमींना चित्रपट, टेलिव्हिजन शो, व्हिडीओ गेम्स, रिअ‍ॅलिटी शो आणि ओटीटी कंटेट संबंधित सगळी माहिती उपलब्ध होते. कथानकाचा सारांश, कलाकारांची नावं व वैयक्तिक माहिती, संबंधित कलाकारांनी आजवर कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम केलंय याविषयीची माहिती, चित्रपटाचा क्रू, ट्रेलर, रिलीज तारखा, समीक्षकांचं मत अशाप्रकारच्या माहितीचा यात समावेश आहे.

Girl Juggling On Chandra Song Vs Beatboxing
‘चंद्रा’ गाण्यावर चिमुकलींची जुगलबंदी! ठसकेबाज लावणीला बीट बॉक्सिंगची साथ; VIDEO पाहून अमृता खानविलकरची कमेंट, म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव
AI generated image of PM Narendra Modi Goes Viral
PM Narendra Modi: कामगाराने गुपचूप काढला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो? पण व्हायरल दावा खरा की खोटा? वाचा सत्य बाजू…
AI Identity and Opportunity career news
कृत्रिम प्रतिमेच्या प्रांगणात: एआय : ओळख आणि संधी
nexus
धोक्याच्या टप्प्यावरचा इतिहास…
Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

हेही वाचा : “माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”

आयएमडीबीची ( IMDb ) स्थापना १९९० मध्ये ‘दोज आइज’ या नावाने करण्यात आली होती. इंग्रजी सिनेप्रेमी आणि संगणक प्रोग्रामर कर्नल नीडहॅम यांनी वैयक्तिक डेटाबेस तयार केला होता. यानंतर आयएमडीबी १९९८ मध्ये Amazon.com ने विकत घेतलं. सध्या, बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपट, टीव्ही शो, वेब सीरीजना IMDb वर १ ते १० दरम्यान रेटिंग दिलं जातं. या रेटिंगनुसार, संबंधित चित्रपट किंवा वेब सीरीज यशस्वी की फ्लॉप आहेत हे सिनेप्रेमींकडून ठरवलं जातं. याशिवाय चित्रपट समीक्षक सुद्धा यावर आपलं मत नोंदवतात. आयएमडीबीकडे टॉप २५० चित्रपटांची यादी आहे, ज्यामध्ये २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फ्रँक डाराबोंट दिग्दर्शित ‘द शॉशँक रिडेम्पशन’ चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता.

आयएमडीबीवर सगळे युजर्स माहिती वाचू शकतात मात्र, माहिती लिहिण्यासाठी किंवा रेटिंग देण्यासाठी या साइटवर युजरचं अधिकृत खातं असणं आवश्यक आहे. फक्त नोंदणीकृत वापरकर्तेच चित्रपटांना रेटिंग देऊन माहिती संपादित करू शकतात.

IMDb वापरकर्त्यांना चित्रपटांना १ ते १० च्या स्केलवर रेटिंग देण्याची परवानगी देतं. युजर्स आणि समीक्षकांचे हे सगळे रेटिंग्ज एकत्रित केले जातात आणि त्यानुसार चित्रपट अथवा टीव्ही मालिकांची लोकप्रियता ठरवली जाते. याशिवाय युजर्स IMDb वर त्यांची वॉचलिस्ट सुद्धा बनवू शकतात. ही साइट तुम्ही पाहिलेल्या आणि रेटिंग दिलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवते. यावर मार्गदर्शक तत्त्व सुद्धा जारी करण्यात आली आहेत. जेणेकरून संबंधित कंटेट कुटुंबासाठी अनुकूल आहे की नाही, कंटेट हिंसक आहे का? अश्लील तर नाही ना? याचीही माहिती सिनेप्रेमींना मिळते.

हेही वाचा : Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ

दरम्यान, उदाहरण सांगायचं झालं, तर IMDb ने २०२४ मध्ये सर्वाधिक चर्चेत आणि प्रसिद्धीझोतात राहिलेल्या भारतीय कलाकारांची नावं जाहीर केली होती. IMDb ने जगभरातील २५ कोटींहून ( दरमहा ) अधिक दर्शकांनी दिलेल्या मतांच्या आधारे ही क्रमवारी ठरवली होती. गेल्यावर्षी या यादीत तृप्ती डिमरीने पहिलं स्थान मिळवलं होतं. याचप्रमाणे चित्रपटाची लोकप्रियता, तसेच रेटिंग ठरवलं जातं.

Story img Loader