अमेरिकेमध्ये एका महिलेने ‘मोमो’ जुळ्यांना जन्म दिला. ‘मोमो’ गर्भधारणा ही दुर्मिळातील दुर्मीळ असते. हिचे प्रमाण ०.१ टक्के असते. ‘मोमो’ गर्भधारणेसंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यांनी ‘मोमो’ गर्भधारणा म्हणजे काय? ही परिस्थिती कधी उद्भवते? या परिस्थितीत काय करावे, याची माहिती दिली.
नैसर्गिकरित्या होणाऱ्या गर्भधारणेमध्ये मोमो प्रकारातील गर्भधारणा होण्याचे प्रमाण ०.१ टक्के आहे. यामध्ये होणारी जुळी मुलेही एकमेकांसारखी दिसतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले.
बर्मिंगहॅम येथील अलाबामा विद्यापीठातील संशोधनानुसार, ‘मोमो’ गर्भधारणा ही दुर्मीळ घटना आहे. ‘मोमो’ गर्भधारणेअंतर्गत अमेरिकेतील एका महिलेने सहा महिन्यांच्या अंतराने दोन-दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. दुसऱ्यांदा झालेली जुळी मुले ही ‘मोमो’ म्हणून ओळखली जातात. ‘मोमो’ हे मोनोअम्नीओटिक-मोनोकोरियोनिकचे संक्षिप्त स्वरूप आहे. अशा प्रकारची ‘मोमो’ गर्भधारणा होणेही दुर्मीळ असते. युनायटेड स्टेट्समध्ये नैसर्गिकरित्या जन्माला येणाऱ्या मुलांपैकी ‘मोमो’ गर्भधारणेची संख्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ‘मोमो’ गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते आणि यात गर्भाच्या जीवाला अधिक धोका असतो.

हेही वाचा : तुम्ही ३० वर्षांचे झाला आहात का ? हृदयासंबंधित ‘या’ गोष्टी नक्की करा…

over12 lakh citizens in maharashtra vaccinated against tuberculosis
राज्यामध्ये १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे झाले क्षयरोग लसीकरण; मुंबईमध्ये अद्याप लसीकरण मोहीमेला सुरुवात नाही
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
wife cuts husbands private parts
दारूच्या नशेत पतीचं पत्नीशी भांडण, संतापलेल्या पत्नीनं पतीच्या गुप्तांगावर…
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
Six hundred gram babys struggle to survive is finally successful
सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जगण्याचा संघर्ष अखेर यशस्वी!
High Court allows 11 year old girl who became pregnant due to sexual abuse, to have abortion at 30 weeks Mumbai news
लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या ११ वर्षांच्या मुलीला दिलासा; ३० व्या आठवड्यांत गर्भपात करण्याची उच्च न्यायालयाकडून परवानगी
Viral Video: Your Birth Month Reveals Who Loves You Most!
तुमच्यावर कोण सर्वात जास्त प्रेम करतं? जन्म महिन्यावरून जाणून घ्या, Video होतोय व्हायरल
Successful Businessmen Born on These Dates
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेले लोक होतात यशस्वी बिझनेसमॅन, नेहमी असतो खिशात पैसा


अमेरिकेमध्ये झालेली ‘मोमो’ घटना काय आहे ?

अमेरिकेमधील एका महिलेने ‘मोमो’ जुळ्यांना जन्म दिला. ही महिला अमेरिकेतील एका शाळेत शिक्षिका आहे. या महिलेने प्रथम दोन जुळ्यांना जन्म दिला. त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी त्यांना पुन्हा गर्भधारणा असल्याचे लक्षात आले. या गर्भधारणेतही जुळी मुले होती. ही महिला २५ आठवड्यांची गरोदर असताना तिला तिला पुन्हा जुळ्या मुलांची अपेक्षा असल्याचे आढळले. त्यानंतर, अल्बा 25 आठवड्यांची गरोदर असताना तिला उच्च जोखीम (हायरिस्क) प्रसूतिशास्त्र विभागात दाखल करण्यात आले. ‘मोमो’ गर्भधारणेत जोखीम असल्यामुळे आणि गर्भाच्या जीवाला धोका असल्यामुळे तिला या विभागातच ठेवण्यात आले. ‘मोमो’मध्ये होणारे मृत्यू हे अधिक आहेत. अमेरिकेतील वैद्यकीय नियमांनुसार ३२ ते ३४ आठवडे झाल्याशिवाय सीझर शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे सीझर शस्त्रक्रिया करून या मुलांना जन्म देणे हे डॉक्टरांचे उद्दिष्ट होते. त्यानुसार २५ ऑक्टोबर, २०२२ रोजी तिने अजून दोन जुळ्यांना जन्म दिला. ३२ आठवड्यांचेच बाळ असल्यामुळे त्यांना अतिदक्षतेत ठेवण्यात आले होते. या महिलेला ७ डिसेंबर, २०२२ रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

‘मोमो’ गर्भधारणा म्हणजे काय?

‘मोमो’ गर्भधारणेमध्ये एकाच गर्भाशयात एकाच गर्भपिशवीत दोन गर्भ निर्माण होतात. सर्वसाधारणत: जुळी मुले होताना दोन पिशव्यांमध्ये दोन गर्भ असतात. परंतु, मोमोमध्ये एकाच पिशवीत दोन गर्भ असल्यामुळे ते दाबले जाण्याची वा घुसमटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रिचेल यांनी सांगितले. मोमो गर्भधारणा ही बहुतांशवेळा गुंतागुंतीचीच असते.

‘मोमो’ स्थिती निर्माण कशी होते ?

निसर्गतः जुळी मुले होताना स्त्रीच्या गर्भाशयात बीजांडकोशातील दोन बीजांडे किंवा अंडे फलित होतात. त्यामुळे दोन गर्भपिशव्या निर्माण होऊन त्यात दोन गर्भ असतात. ‘मोमो’मध्ये एकाच अंड्याचे दोन भाग होतात. त्यामुळे एकाच गर्भपिशवीत दोन गर्भ असतात. त्यांची केवळ नाळ वेगळी असते. परंतु, पाणी (फ्लुइड) समान असते, असे मदरहूड हॉस्पिटल, खारघरच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ प्रतिमा ठमके यांनी सांगितले.
मोमो हा दुर्मीळ गर्भधारणेचा प्रकार आहे. जुळी मुले होतानाही मोमो पद्धतीने होणारी जुळी मुले १ टक्क्यापेक्षाही कमी आहेत, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.