अमेरिकेमध्ये एका महिलेने ‘मोमो’ जुळ्यांना जन्म दिला. ‘मोमो’ गर्भधारणा ही दुर्मिळातील दुर्मीळ असते. हिचे प्रमाण ०.१ टक्के असते. ‘मोमो’ गर्भधारणेसंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यांनी ‘मोमो’ गर्भधारणा म्हणजे काय? ही परिस्थिती कधी उद्भवते? या परिस्थितीत काय करावे, याची माहिती दिली.
नैसर्गिकरित्या होणाऱ्या गर्भधारणेमध्ये मोमो प्रकारातील गर्भधारणा होण्याचे प्रमाण ०.१ टक्के आहे. यामध्ये होणारी जुळी मुलेही एकमेकांसारखी दिसतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले.
बर्मिंगहॅम येथील अलाबामा विद्यापीठातील संशोधनानुसार, ‘मोमो’ गर्भधारणा ही दुर्मीळ घटना आहे. ‘मोमो’ गर्भधारणेअंतर्गत अमेरिकेतील एका महिलेने सहा महिन्यांच्या अंतराने दोन-दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. दुसऱ्यांदा झालेली जुळी मुले ही ‘मोमो’ म्हणून ओळखली जातात. ‘मोमो’ हे मोनोअम्नीओटिक-मोनोकोरियोनिकचे संक्षिप्त स्वरूप आहे. अशा प्रकारची ‘मोमो’ गर्भधारणा होणेही दुर्मीळ असते. युनायटेड स्टेट्समध्ये नैसर्गिकरित्या जन्माला येणाऱ्या मुलांपैकी ‘मोमो’ गर्भधारणेची संख्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ‘मोमो’ गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते आणि यात गर्भाच्या जीवाला अधिक धोका असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा