Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे हे अतिशय जबाबदरीचे काम आहे, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या विविध आर्थिक उत्पन्नाच्या स्त्रोतांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.

आयटीआरला आणखी क्लिष्ट बनवणारी गोष्ट म्हणजे उत्पन्नाचे वर्गीकरण. आयटीआर दाखल करताना त्याचे वर्गीकरण पाच वेगवेगळ्या विभागांत केले जाते – पगार, व्यवसाय, भांडवली नफा, घराची मालमत्ता आणि ‘इतर स्रोत.’ प्रत्येक विभागामधले तुमचे उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे.

What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती? पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे आहे जास्त मालमत्ता
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ

मुंबईस्थित चार्टर्ड अकाउंटंट सुरेश सुराणा यांच्या मते, आपल्याकडे वेगवेगळ्या मार्गाने येणारे उत्पन्न जाहीर न करणे ही एक चूक आहे, जी बहुतेक जण इन्कम टॅक्स रिटर्न-फाईल भरताना करतात.

हेही वाचा… Viral Video: हद्दच झाली! चपलेनं तोंडावर मारलं अन्…,दिल्ली मेट्रोमध्ये झालेली हाणामारी पाहून बसेल धक्का

“करदात्यांनी व्याज, लाभांश, रॉयल्टी, भाडे इत्यादी उत्पन्न सर्व स्त्रोतांमधून कमावलेले उघड करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त करदात्यांनी त्यांच्या मायदेशातील तसेच परदेशातीलही मालमत्ता आणि परदेशातून कमावलेले उत्पन्न उघड करणे आवश्यक आहे,”असे सुराणा म्हणतात.

एक कॅटेगरी जी बऱ्याचदा आपण विसरतो, ती म्हणजे ‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न.’ AKM ग्लोबल या कर आणि सल्लागार कंपनीचे टॅक्स मार्केट हेड येशु सेहगल म्हणतात की, रिटर्न-फाईल भरताना बरेच लोक त्यांच्या सर्व उत्पन्नाची माहिती देण्यास विसरतात.

उदाहरणार्थ, पगारदार व्यक्ती पगाराला त्यांचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत मानतात आणि अनेकदा व्याज, भाडे इत्यादींचा आयटीआर दाखल करायला विसरतात. “हे उत्पन्नाचे स्रोत उघड केले नाही तर व्यवहारात गुंतागूंत, दंड यांसारख्या त्रुटींचा सामना करावा लागतो, असंही येशु सेहगल म्हणतात.

इतर स्त्रोतांकडून उत्पन्न

‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ या कॅटेगरीमध्ये मोडणारे सर्वात सामान्य उत्पन्नाचे प्रकार म्हणजे, बचत खाती, मुदत ठेवी (FDs), आवर्ती ठेवी (RDs) आणि बॉण्ड्स. बहुतेक लोकांची बचत खाती असतात आणि अनेकांकडे मुदत ठेवीदेखील असतात. बँका सामान्यत: बचत खाती, एफडी आणि आरडीमधून थेट एखाद्याच्या बँक खात्यात व्याज जमा करतात. तथापि, बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही, ते दुर्लक्ष करतात किंवा हे उत्पन्नदेखील ITR मध्ये उघड करणे आवश्यक आहे याची जाणीव त्यांना नसते.

लक्षात ठेवा, व्याजाच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्नही उघड करणे महत्त्वाचे आहे. ६० वर्षांपेक्षा कमी आणि ६० वर्षांहून अधिक नागरिकांसाठी व्याज उत्पन्न आणि त्यावरील कर वेगवेगळे आहेत, त्याची माहिती घेऊन व्याज उत्पन्न उघड करणे आवश्यक आहे.

दरम्यान, व्याजाव्यतिरिक्त शेअर्स, म्युच्युअल फंडमधून आर्थिक वर्षात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न मिळणाऱ्या नागरिकांचे हे उत्पन्नही रिटर्न-फाईलमध्ये उघड करणे आवश्यक आहे. निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना मिळणारे कौटुंबिक निवृत्ती वेतनदेखील यामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे.

उत्पन्नाचा गट योग्य निवडणे महत्त्वाचे

ITR फॉर्म भरताना उत्पन्नाचा गट योग्य निवडणे महत्त्वाचे आहे. इतर उत्पन्नासाठी आयटीआर-१, आयटीआर-२, आयटीआर-३ आणि आयटीआर-४ हे फॉर्म भरू शकतो. या फॉर्मद्वारे तुमच्या इतर उत्पन्नाची नोंद केली जाऊ शकते. कोणतीही माहिती लपवल्यास किंवा कर न दाखवल्याने दंड लागू शकतो, त्यामुळे आयटीआर वेळेवर भरणं आवश्यक आहे. तसेच आयटीआर भरताना कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी पुन्हा एकदा सर्व चेक करा आणि सर्व उत्पन्न स्रोत समाविष्ट करा.