CNG car mileage Tips: देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांसाठी सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु, सीएनजी कारही चांगला मायलेज देत नाही, अशी तक्रार अनेक ड्रायव्हर्स करतात. अशा परिस्थितीत मायलेज कसा वाढवायचे हा प्रश्न आहे. जर तुम्हालाही अशीच समस्या भेडसावत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सीएनजी कारचा मायलेज वाढवू शकता. तर आज जाणून घेऊया सोप्या टिप्स…
सीएनजी कारचे मायलेज वाढवण्यासाठी टिप्स
१. एअर फिल्टर स्वच्छ ठेवा
सीएनजी कारचे मायलेज वाढण्यासाठी सर्वप्रथम कारच्या एअर फिल्टरची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येक पाच हजार किमी प्रवासात कारचे एअर फिल्टर बदलले पाहिजे. कारण सीएनजी हवेपेक्षा हलका असल्याने एअर फिल्टर बदलणे आवश्यक आहे. चांगल्या मायलेजसाठी हवा आणि सीएनजीचे गुणोत्तर योग्य असणे गरजेचे असते. त्यामुळे कारचे एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा.
२. टायरचा दाब कायम ठेवा
टायरचा प्रेशर नेहमी तपासणे गरजेचे आहे. योग्य टायर प्रेशर सीएनजी कारचे मायलेज सुधारण्यासाठी आवश्यक आहे. खासकरून उन्हाळा आणि हिवाळ्यात टायरचा प्रेशर तपासणे गरजेचे आहे. टायरमध्ये हवा कमी असेल तर गाडीवर जास्त दाब येतो त्यामुळे सीएनजीचा जास्त वापर होतो. चारही टायरचा हवेचा दाब योग्य ठेवणे फायद्याचे आहे. टायरमध्ये हवा कमी असेल तर इंजिनला जास्त काम करावे लागते. म्हणूनच जेव्हाही तुम्ही प्रवासाला जाल तेव्हा वाहनाच्या टायरचा दाब तपासा.
(आणखी वाचा : भारतीय ग्राहक सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ‘या’ ५ बाईक्सच्या प्रेमात; पाहा यादी )
३. गॅस गळती तपासा
जर कारमध्ये गॅस लीक होत असेल तर कारचे मायलेज नक्कीच कमी होईल. कार मधील छोटासा लीक देखील कारचे मायलेज कमी करू शकतो. त्यामुळे कारमध्ये गॅस डिटेक्टर बसवणे खूप चांगले होईल. त्यामुळे तुम्हाला कार मधील गॅसचा छोटासा लीक देखील कळेल. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील ते फायद्याचे आहे. कालांतराने सीएनजी किट गळती सुरू होते. अनेकदा अनेकांना स्वस्तात सीएनजी किट बसवतात, त्यांनाही अशी समस्या भेडसावते. सिलेंडरला जोडणाऱ्या पाईपमधून गळती होत आहे का ते वेळोवेळी तपासत रहा. यामुळे मायलेजवर तर परिणाम होतोच, पण जीवालाही धोका असतो.
४. स्पार्क प्लग बदलणे
सीएनजी कारचे इग्निशन तापमान पेट्रोल कार पेक्षा जास्त असते. त्यामुळे सीएनजी कार मध्ये शक्तिशाली स्पार्क प्लग वापरावेत. तुम्हाला कारमध्ये समान कोडचा स्टार प्लगचा योग्य संख्या असल्याची खात्री करावी लागते. त्याच वेळी कारची उष्णता श्रेणी देखील कंपनीच्या नियमानुसार असावे. चांगल्या स्पार्क प्लगमुळे सीएनजी आणि हवेच्या मिश्रणाची चांगली प्रज्वलन होते. यामुळे देखील कारचे मायलेज सुधारते. पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी वाहनाचे इग्निशन तापमान जास्त असते. म्हणून, सीएनजी कारमध्ये मजबूत स्पार्क प्लग आवश्यक आहे. तुमच्या कारमध्ये फक्त चांगल्या दर्जाचे स्पार्क प्लग लावा. ते निकृष्ट दर्जाचे असल्यास, ते त्वरित बदलून घ्या.