भारत यंदा १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७७ वा ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ७ वाजता लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाचा राष्ट्रध्वज फडवणार आहेत. यानंतर ते देशवासियांना संबोधित करणार आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करणारा आपला भारत हा एकमेव देश नाही, जगातील आणखी ५ देश आहेत जे १५ ऑगस्ट हा त्यांचा ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करतात. त्यामुळे हे देश कोणते आहेत, जाणून घेऊ….

१५ ऑगस्ट २०२३ रोजी ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असेल, लाल किल्‍ल्‍यावरील स्‍वातंत्र्य दिनाच्‍या समारंभात विशेष अतिथी म्‍हणून देशभरातून १८०० लोकांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. याशिवाय देशातील खेड्या-पाड्यात, शहरात यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
issue of Kashmir
संविधानभान : संविधानसभेत काश्मीरचा मुद्दा
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
Nandurbar bus overturned marathi news
नंदुरबार जिल्ह्यात बस उलटली

१) १५ ऑगस्टला केवळ भारतातच नाही तर जगातील इतर पाच देशांमध्येही स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. भारताप्रमाणे दक्षिण कोरियालाही १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. १५ ऑगस्ट १९४५ रोजी दक्षिण कोरियाला जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस दक्षिण कोरियामध्ये ‘नॅशनल हॉलिडे’ म्हणून साजरा केला जातो. अमेरिका आणि सोव्हिएत सैन्याने दक्षिण कोरियाला जपानच्या ताब्यातून मुक्त केले.

२) दक्षिण कोरियानंतर उत्तर कोरियामध्येही १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४ ५ रोजी हे दोन्ही देश जपानच्या ताब्यातून मुक्त झाले. यामुळे उत्तर कोरिया देखील १५ ऑगस्टला ‘नॅशलन हॉलिडे’ म्हणून साजरा करतो. विशेष बाब म्हणजे हा सुट्टीचा दिवस असल्याने उत्तर कोरियामध्ये या दिवशी लग्न करण्याची एक परंपरा सुरु झाली.

३) लिकटेंस्टीन हा देश अनेक वर्षे जर्मनीच्या ताब्यात होता. पण १५ ऑगस्ट १८६६ रोजी लिकटेंस्टीनने जर्मनीच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले. लिकटेंस्टीन १९४० पासून १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहे. लिकटेंस्टीन हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे.

४) बहरीनलाही १५ ऑगस्टलाच ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. १५ ऑगस्ट १९७१ रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी ब्रिटिश सैन्याने १९६० पासून बहरीन सोडण्यास सुरुवात केली होती. १५ ऑगस्ट रोजी बहरीन आणि ब्रिटन यांच्यात एक करार झाला. यानंतर बहरीनने स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनशी संबंध कायम ठेवले.

५) आफ्रिकन देश काँगोला १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रेंच गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर हा देश डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो बनला. १८८० पासून काँगो फ्रान्सच्या ताब्यात होता. तेव्हा तो फ्रेंच काँगो म्हणून ओळखले जात होता. नंतर १९०३ मध्ये तो मध्य काँगो बनला.

Story img Loader