Difference between flag hoisting of independence day and republic day: या वर्षी भारतात १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. देश स्वतंत्र झाल्यानंतर संपूर्ण देशातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. सर्वत्र आपण मुक्त झाल्याचा जल्लोष मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. त्याच वेळी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारतात या दोन खास दिवशी तिरंगा फडकवला जातो. पण, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यात फरक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फडकवलेल्या ध्वजातील फरक जाणून घ्या.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यात काय फरक आहे?

Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण असले, तरी ते साजरे करण्याच्या पद्धतीत फरक आहे.

पहिला फरक १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वज खालून दोरीने वर खेचला जातो, नंतर तो उघडला जातो आणि फडकवला जातो, याला ध्वजारोहण म्हणतात. हे १५ ऑगस्ट १९४७ च्या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करण्यासाठी केले जाते. घटनेत याला ध्वजारोहण असे म्हणतात. त्याचवेळी २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त, ध्वज शीर्षस्थानी बांधलेला असतो, जो उघडला जातो आणि फडकवला जातो. घटनेत याला ध्वजांकित म्हणतात.

दुसरा फरक, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती राष्ट्राला आपला संदेश देतात. २६ जानेवारी हा दिवस देशात संविधानाच्या अंमलबजावणीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी संविधानप्रमुख राष्ट्रपती ध्वज फडकवतात. राष्ट्रपती २६ जानेवारीलाच ध्वजारोहण का करतात? तर पंतप्रधान हा देशाचा राजकीय प्रमुख असतो, तर राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो. २६ जानेवारी १९५० रोजी देशाची राज्यघटना लागू झाली, त्यामुळे राष्ट्रपती २६ जानेवारीलाच ध्वजारोहण करतात.

हेही वाचा >> Paris Olympics Medals: ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडलमध्ये किती सोनं असतं? जाणून घ्या सोन्याचं प्रमाण

ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक

१. स्वातंत्र्य दिनाला (१५ ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत तिरंगा फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जाते.

२. तर प्रजासत्ताक दिनाला (२६ जानेवारी) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते.