Guidelines For Hoisting India’s Tricolour : १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी आपला देश ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करणार आहे. देशाच्या या राष्ट्रीय सणाची सध्या देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ तसेच सरकारी इमारती आणि खासगी कार्यालयांच्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जातो.

राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व

राष्ट्रीय ध्वज तिरंगा म्हणूनसुद्धा ओळखला जातो. या तिरंग्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिरंग्याची रचना आणि रंगामागे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेले आहेत. केशरी रंग त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे, पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग देशाची समृद्धी दर्शवते. पांढऱ्या पट्ट्यामध्ये मध्यभागी अशोकचक्र आहे. या अशोकचक्रामध्ये २४ आरे आहेत. या प्रत्येक आऱ्याचा वेगवेगळा अर्थ आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य

राष्ट्रध्वज फडकवणे आणि वापरणे यासाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत आणि ध्वजाचा आदर आणि सन्मान जपत ध्वज फडकवणे, हा या मार्गदर्शक तत्त्वांचा महत्त्वाचा उद्देश आहे.

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकवला जातो, याला ध्वजारोहण असे म्हणतात आणि तो उतरवताना हळूहळू खाली उतरवावा. तिरंग्याचा जमिनीला किंवा पाण्याला कधीही स्पर्श करू नये किंवा कपडे म्हणून तिरंगा वापरू नये. खराब झालेला तिरंगा फडकवू नये, यासह अनेक नियम आहेत. तिरंगा फडकवताना काय करावे आणि काय करू नये, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या.

हेही वाचा : Top 10 Poorest Country In The World: जगातील सर्वांत जास्त गरीब देश कोणते? पहिल्या दहामध्ये भारताचा समावेश आहे का? पाहा यादी

तिरंगा फडकवताना काय करावे?

१. नवीन संहितेच्या कलम २ अंतर्गत सर्व नागरिकांना त्यांच्या खाजगी जागेवर तिरंगा फडकवण्याचा अधिकार आहे.

२. सार्वजनिक, खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेचे सदस्य कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही प्रसंगी राष्ट्रध्वज फडकवू शकतात.

३. राष्ट्रध्वज शाळा, महाविद्यालये, क्रीडा कॅम्प, स्काऊट कॅम्प इत्यादी शैक्षणिक संस्थांमध्येसुद्धा फडकवला जाऊ शकतो.

४. शाळांमध्ये तिरंगा फडकवताना शपथ घ्यावी.

५. या राष्ट्रीय प्रतीकाचे महत्त्व ओळखून राष्ट्रध्वज आदर आणि सन्मानाने फडकवा.

६. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि इतर राष्ट्रीय आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या कार्यक्रमाला ध्वज फडकवा.

७. ध्वज फडकवताना तिरंग्यातील केशरी पट्टी शीर्ष स्थानी असावी आणि हिरवी पट्टी तळाशी असावी.

८. जेव्हा तुम्ही ध्वज वापरत नाही, तेव्हा त्रिकोणी आकारात ध्वज योग्य पद्धतीने घडी करून ठेवावा.

९. राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकवला जातो. राष्ट्रध्वजाला उतरवताना हळूहळू खाली उतरवावा. फडकवताना व उतरवताना सलामी द्यावी.

१०. राष्ट्रध्वज नेहमी प्रमुख जागेवर फडकावा. जर आजूबाजूला इतर ध्वज असतील तर त्या ध्वजांच्या समूहामध्ये तिरंगा आदर्शपणे सर्वोच्च ध्वज असावा.

११. ध्वज फडकवणाऱ्यांनी स्वच्छ पोशाख, शक्यतो औपचारिक पोशाख परिधान करावा.

१२. ध्वजाचा आकार आणि त्यासाठी वापरलेले साहित्य योग्य व चांगल्या दर्जाचे असावेत.

तिरंगा फडकवताना काय करू नये?

१. तिरंग्याचा वापर सांप्रदायिक किंवा धार्मिक फायद्यासाठी करू नये. तिरंग्याचा कपड्यांसाठी वापर करू शकत नाही. याशिवाय तिरंग्याचा सजावटीसाठी वापर करू नये, तसेच तिरंगा हा टेबलक्लॉथ, रूमाल किंवा कोणत्याही डिस्पोजेबल वस्तू म्हणून वापरला जाऊ शकत नाही.

२. तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवावा.

३. ध्वजाचा अनादर होईल असे कोणतेही कृत्य करू नका. ध्वजावर पाय न पडणे, ध्वजाला जमिनीवर न ठेवणे किंवा ध्वजाला जमिनीचा किंवा पाण्याचा स्पर्श होऊ न देणे याविषयी काळजी घ्यावी.

४. तिरंग्यापेक्षा कोणताही उंच ध्वज तुम्ही फडकवू शकत नाही.

५. तिरंग्यावर फुले किंवा हार किंवा कोणतीही वस्तू ठेवता येत नाही.

६. हार किंवा तोरणामध्ये तुम्ही तिरंग्याचा वापर करू शकत नाही.

७. खराब झालेला ध्वज फडकवू नका, कारण तो राष्ट्रीय चिन्हाचा अनादर मानला जातो.

८. सरकारमान्य प्रसंगी ध्वज कधीही अर्ध्यावर फडकवू नका.

९. ध्वजावर कोणत्याही प्रकारची घोषणा, शब्द किंवा डिझाइन काढू नका.

१०. राष्ट्रीय सणाला वाहनांवर लहान ध्वज लावावा. ध्वजाचा खाजगी किंवा वैयक्तिक कारणांसाठी वापर करू नका.

११. ध्वज रात्री फडकवू नका.

१२. जो ध्वज सध्या वापरत नाही, तो ध्वज चुरगळला जाऊ नये, याची काळजी घ्या. ध्वजाची नीट घडी करावी आणि तो व्यवस्थित ठेवावा.

राष्ट्रीय ध्वज फडकवणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) या राष्ट्रीय सणांच्या दिवशी तसेच राज्य आणि स्थानिक सणांच्या वेळी ध्वज फडकवला जातो. भारताचा समृद्ध इतिहास व विविधता दर्शवणारे हे प्रतीक आहे. या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करणे, ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.