Independence Day Google Doodle: १५ ऑगस्ट २०२३ म्हणजेच आज भारत देश आपला ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची नांदी केली आहे. तर दुसरीकडे गूगलने सुद्धा भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे एक डूडल साकारून भारतीयांना खास सरप्राईझ दिले आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी गुगलने समृद्ध कापड हस्तकला परंपरा प्रदर्शित केली आहे.
गूगलने या डूडलविषयी सांगितले की, “आजचे डूडल भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तयार करण्यात आले आहे. नवी दिल्लीस्थित कलाकार नम्रता कुमार यांनी हे डूडल साकारले आहे. १९४७ ला ‘याच’ दिवशी, ब्रिटीश राजवटीपासून भारत स्वतंत्र झालं व एका नवीन युगाची सुरुवात झाली, समस्त भारतीयांना या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा”
नम्रता कुमार यांनी डूडलच्या निर्मितीमागील कल्पना आणि प्रेरणा याबद्दल देखील माहिती दिली, देशाच्या विविध भौगोलिक प्रदेशांचे प्रतिनिधित्व करताना समतोल राखायचा होता या संपूर्ण सर्जनशील प्रक्रियेदरम्यान, राष्ट्राच्या अस्मितेशी जवळचा संबंध असलेल्या भारतातील वस्त्रोद्योगांचा सन्मान करणे हा मुख्य उद्देश होता, असेही नम्रता यांनी सांगितले. दरम्यान आपण बारकाईने पाहिल्यास या गूगल डूडलमध्ये तब्बल २१ प्रकारच्या फॅब्रिकचा समावेश करण्यात आला आहे. यातील प्रत्येक कापडाचे नाव आणि ते कोणत्या राज्याचे प्रतिनिधित्व करते याविषयी माहिती देणारा हा तक्ता आवर्जून पाहा.
‘गूगल डूडल’ मधील त्या २१ कापडांची नावे काय?
अनु. | फॅब्रिकचे नाव | राज्याचे नाव |
1 | कच्छ भरतकाम | गुजरात |
2 | पट्टू विणकाम | हिमाचल प्रदेश |
3 | जामदानी | पश्चिम बंगाल |
4 | कुणबी विणकाम | गोवा |
5 | इकत | ओडिशा |
6 | पश्मिना कानी | जम्मू काश्मीर |
7 | बनारसी | उत्तर प्रदेश |
8 | पैठणी | महाराष्ट्र |
9 | कंठा/कांथा/कांता | पश्चिम बंगाल |
10 | नागा विणकाम | नागालँड |
11 | अजरख/अज्रक | कच्छ, गुजरात |
12 | आपटणी | अरुणाचल प्रदेश |
13 | फुलकारी | पंजाब |
14 | लेहरीया | राजस्थान |
15 | कांजीवरम | तामिळनाडू |
16 | सुझानी/ सूजनी | बिहार |
17 | बांधणी | गुजरात/राजस्थान |
18 | कासावू | केरळ |
19 | इरकल | कर्नाटक |
20 | मेखला | आसाम |
21 | कलमकारी | आंध्रप्रदेश |
हे ही वाचा<< १९४७ चा स्वातंत्र्य दिन सोहळा पुन्हा अनुभवा; स्वातंत्र्याची घोषणा, नेहरूंचं अजरामर भाषण ते ध्वजारोहण, पाहा Video
तुम्हाला ही नावे माहित होती का? आणि ही कलाकृती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.