ओडीशाच्या बालासोरमध्ये झालेल्या अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली होती. काही रुग्णांना तात्काळ उपचाराची सुविधा न मिळाल्याने त्यांच्या दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. आपातकालिन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ मदत करता येईल, अशी सुविधा रेल्वेकडे नाही का? असाही प्रश्न समोर आला आहे. भारताकडे जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन आहे. ही एक प्रकारची स्पेशल ट्रेन आहे. ज्याचा वापर भारतीय रेल्वे काही महत्वाच्या वेळी करत असते. या ट्रेनचा खासियत काय आहे? तसंच या ट्रेनचा वापर केव्हा केला जातो? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणती आहे ही ट्रेन?

भारतीय रेल्वेच्या या विशेष ट्रेनचा नाव आहे, लाइफलाइन एक्स्प्रेस. या ट्रेनच्या माध्यमातून भारतीय रेल्वे देशाच्या त्या ठिकाणी आरोग्यासंबंधीत मदत पोहोचवते, जिथे रुग्णालय नाही आहेत किंवा जिथे सहजरित्या औषधे किंवा डॉक्टर पोहोचू शकत नाहीत. ही ट्रेन पूर्णपणे हॉस्पिटलसारखी डिजाईन केलेली आहे. यामध्ये रुग्णांसाठी बेडची सुविधा आहे. आधुनिक मशिन आहे. ऑपरेशन थिएटर आहे आणि आरोग्य कर्मचारी आहेत. या ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये तुम्हाला पॉवर जनरेटर, मेडिकल वार्ड, पॅंट्री कार आणि मेडिकल सुविधा मिळतील.

नक्की वाचा – इवल्याशा सशाने महाकाय नागाची केली हवा टाईट पण फणा काढल्यानंतर घडलं असं काही…Video पाहून थक्क व्हाल

या ट्रेनला कधी आणि केव्हा चालवलं?

या ट्रेनला भारतीय रेल्वेने वर्ष १९९१ मध्ये चालवलं आहे. सुरुवातीच्या दिवसापासूनच या ट्रेनचे सर्व कोच वातानुकूलित होते. ज्या लोकांना सहजरित्या रुग्णालयात पोहोचता येऊ शकत नाही, त्या लोकांसाठी या ट्रेनला चालवलं जातं. जी माणसं देशाच्या कानाकोपऱ्यात दूर ठिकाणी राहतात, तसेच जे लोक गरीब आहेत आणि उपचारासाठी दिल्ली किंवा मुंबईत जाऊ शकत नाहीत. खासकरून दिव्यांग लोकांसाठी ही मोठी समस्या होती. भारत सरकारने अशाच लोकांसाठी अशी एक ट्रेन बनवली जी रुग्णांजवळ जाऊन त्यांना चांगलं उपचार देऊ शकेल. भारतीय रेल्वे बोर्डाच्या रिपोर्टनुसार, या हॉस्पिटल ट्रेनच्या मदतीने १२ लाख लोकांवर उपचार करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India has the worlds first hospital train know the details of railway and how the railway department uses it nss