सरकारी नोकऱ्यांसाठी भारतीय टपाल विभागात अनेक पर्याय आहेत. यात ग्रामीण डाक सेवक, पोस्टमास्तर अशा अनेक पदांवर भरती केली जाते. यातील ग्रामीण डाक सेवक भरती देखील खूप लोकप्रिय आहे, कारण १० वी पास उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात, विशेषत: हजारो पदांसाठीची भरती यावर येत राहतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक बनण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे आणि किती पगार मिळतो याबाबतची माहिती देणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामीण डाक सेवक भरती अंतर्गत, ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टेंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे. पोस्ट विभाग वेळोवेळी या पदांसाठी भरती करत असते. नुकतीच १२,००० पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया संपली आहे. यापूर्वी सुमारे ४० हजार पदांसाठी भरती करण्यात आली होती.

ग्रामीण डाक सेवक बनण्यासाठी आवश्यक पात्रता?

ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्याला स्थानिक भाषेचेही ज्ञान असायला हवे. याशिवाय जीडीएस पदांसाठी सायकल चालवता आली पाहिजे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे.

उमेदवारांची निवड कशी होते?

सिस्टममध्ये जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे ग्रामीण डाक सेवक पदांसाठी निवड केली जाते. ही मेरिट लिस्ट उमेदवारांनी १० वी मध्ये मिळवलेले गुण आणि त्यांनी भरलेल्या पदांच्या प्राधान्याच्या आधारे तयार केली जाते.

किती मिळतो पगार?

ब्रांच पोस्टमास्टर पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला १२,००० रुपये ते २९,३८० रुपये मासिक वेतन दिले जाते. तर असिस्टेंट ब्रांच पोस्टमास्टर पदासाठी १०,००० ते २४,४७० रुपयांपर्यंत पगार मिळतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India post gds recruitment salary in hand pay scale online form eligibility gramin dak sevak sjr