India Railways : भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वे हे सर्वात जलद माध्यम मानले जाते, त्यामुळे आज देशभरातील करोडो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. तसेच रेल्वेचा प्रवास हा स्वस्त, आरामदायी आणि सुरक्षित मानला जातो, त्यामुळे प्रवासासाठी सर्वाधिक लोकांची पसंती ही रेल्वेला असते. तुम्हीही कधी ना कधी ट्रेनने प्रवास केला असेलच.
प्रवासादरम्यान कधी तुमच्या लक्षात आले आहे का की, ट्रेनच्या वेगवेगळ्या डब्यांवर वेगवेगळे शब्द लिहिलेले असतात. त्यापैकी काही डब्यांवर H1 तर काहींवर H2, A1, A2 असे लिहिलेले असते. पण, याचा अर्थ नेमका काय तुम्हाला तुम्हाला माहितेय का? जर तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही तुम्हाला याविषयीची माहिती देतो.
ट्रेनच्या डब्यांवर अशी अक्षरं का लिहिली जातात?
तुमच्यापैकी अनेकांना फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड एसीबद्दल माहिती आहे, पण बरेच लोक H1, H2 किंवा A1 बद्दल संभ्रमात आहेत, त्यामुळे सर्वप्रथम आपण ट्रेनच्या डब्यांवर अशी अक्षरं का लिहिली जातात हे जाणून घेऊ. तर ही अक्षरं ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचा डबा ओळखण्यासाठी लिहिली जातात. या अक्षरांसह काही संख्याही लिहिल्या जातात. उदा. H1, H2, A1, A2…
H1 का लिहिले आहे?
ज्याप्रमाणे चेअर कारच्या कोचवर CC किंवा थर्ड एसीच्या कोचवर B3 लिहिलेले असते, त्याचप्रमाणे फर्स्ट क्लास एसी कोचवर H1 लिहिलेले असते.
फर्स्ट क्लास एसी कोच हा इतर कोचपेक्षा वेगळा असतो. या कोचमध्ये प्रवाशांना स्वतःची खासगी केबिन मिळते. तसेच इतर डब्यांपेक्षा चांगल्या सुविधांचा त्यात समावेश आहे. या कोचमधील एका केबिनमध्ये दोन प्रवासी प्रवास करू शकतात. या केबिनला स्लायडिंगचा दरवाजा असतो. या कोचमध्ये साइड सीट्स नसतात.
जर ट्रेनच्या डब्यावर H2 लिहिले असेल तर त्याचा अर्थ फर्स्ट क्लास AC असा होतो. वास्तविक, फर्स्ट एसी दोन भागात आहे. एका भागात H1 आणि दुसऱ्या भागात H2 आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या तिकिटावर H2 लिहिलेले असेल तर तुमची सीट फर्स्ट क्लास एसीच्या H2 मध्ये असते.
“तुला माहितीये का मी कोण”, विनातिकीट प्रवाशाची धमकी, टीटीईने काही क्षणांत उतरवला माज; video viral
जर ट्रेनच्या डब्यावर A1 आणि A2 लिहिलेले असले तरी गोंधळून जाण्याची गरज नाही. जर तिकिटावर A1 आणि A2 लिहिले असेल तर याचा अर्थ तुमची सीट सेकंड एसीमध्ये बुक झाली आहे.
याशिवाय जर ट्रेनच्या डब्यावर 3A लिहिले असेल आणि तुमच्या तिकिटावरही तेच असेल तर याचा अर्थ तुमची सीट थर्ड एसीमध्ये आहे. याशिवाय थर्ड एसीमध्ये B1, B2, B3 सारखे डबे समाविष्ट असतात.