भारतीय रेल्वे प्रवाशांच्या प्रत्येक श्रेणीनुसार सेवा पुरवते, परंतु प्रवाशांना वेटिंग तिकिटांबाबत अनेक अडचणींना समोरे जावे लागते. यात उशीरा तिकीट बुक करणाऱ्यांसाठी रेल्वेने तात्काळ तिकिटांची व्यवस्था केली आहे. परंतु काही वेळा तिकीटांची मागणी जास्त असल्याने तात्काळमध्येही वेटिंग तिकिट मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तात्काळमध्ये वेटिंग तिकिट मिळण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत, जे प्रत्येक प्रवाशाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तात्काळमधील वेटिंगबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्यात एक प्रश्न महत्त्वाचा आहे की, जर तात्काळमध्ये तिकीट कन्फर्म झाले नाही तर पैसे परत मिळतील का? यात जर पैसे कापले गेले तर रेल्वेकडून किती शुल्क आकारले जाते?

वेटिंग तिकीटावर प्रवास करू शकतो का?

तात्काळ वेटिंग तिकिटाबद्दल बोलायचे झाले तर, तात्काळ वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करता येत नाही. तात्काळ वेटिंग तिकिट हे रेल्वेकडून आपोआप रद्द केले जाते. हे तिकीट एक दिवस अगोदर बुक केले जाते, पण जर काही उशीर झाल्यामुळे वेटिंग तिकीट बुक केले असेल तर तुम्ही प्रवास करू शकत नाही.

हेही वाचा : …’हा’च प्राणी ठरला भारतीय रेल्वेची ओळख, जाणून घ्या

वेटिंग तिकीट बुक झाल्यानंतर पैसे रिफंड मिळतात का?

वेटिंग तिकीट बुक केल्यास पैसे परत मिळत नाहीत, असा अनेकांचा समज आहे, पण तसे नाही. तात्काळ वेटिंग तिकीट जर रेल्वेने रद्द केल्यानंतर त्याचे पैसे परत केले जातात. मात्र रेल्वेकडून त्याऐवजी बुकिंग चार्ज घेतला जातो. तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसले तरी बुकिंग चार्ज रेल्वेकडून घेतला जातो. या परिस्थितीत जेव्हा तिकिटाचे पैसे रेल्वेला परत करावे लागतात, तेव्हा रेल्वे बुकिंग चार्ज घेत उरलेले पैसे रिफंड करते.

सोप्या भाषेत सांगायचे तर, वेटिंग तिकिटाच्या रिफंडमध्ये काही पैसे रेल्वेकडून रिफंड केले जात नाहीत, जे सुमारे १० टक्के आहे. मात्र हे शुल्क ट्रेन आणि त्याच्या क्लासवर अवलंबून असते. साधारणपणे एसी क्लासच्या तिकिटाच्या रिफंडवर रेल्वेकडून १०० ते १५० रुपये चार्ज कापला जातो. आणि त्यानंतर उर्वरित पैसे प्रवाशाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. स्लीपर क्लासमध्ये ही रक्कम थोडी कमी असते आणि चार्ज म्हणून कमी पैसे घेतले जातात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India railways tatkal waiting list fare return policy know how much money you will get in waiting list check here all details sjr