Railway Knowledge : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतेक जण रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडतात. कारण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. त्यामुळे लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेची जवळपास ७००० ते ८५०० लहान-मोठी रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान एकतरी रेल्वे स्थानक आहे. तर काही ठिकाणी एकाच जिल्ह्यात एकापेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहेत. पण भारतात असे एक राज्य आहे जिथे संपूर्ण राज्यासाठी केवळ एकच रेल्वे स्थानक आहे. याच रेल्वे स्थानकावरून राज्यातील नागरिक प्रवास करतात.
कोणत्या राज्यात एकच रेल्वे स्टेशन आहे?
भारताच्या पूर्वेकडील टोकाला वसलेले मिझोराम हे राज्य आहे. जिथे संपूर्ण राज्यात केवळ एकच रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव बैराबी रेल्वे स्थानक असे आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनच्या पुढे एकही स्टेशन नाही. या स्टेशनवर प्रवाशांसोबत मालाचीही वाहतूक केली जाते. राज्यात दुसरे कोणतेही रेल्वे स्थानक नसल्याने ज्यांना रेल्वेने प्रवास करायचा आहे ते सर्व प्रवासी याच रेल्वे स्टेशनवर गर्दी करतात. या स्टेशननंतर भारतीय रेल्वेचा मार्ग संपतो. यामुळे हे देशातील सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी ज्या काही ट्रेन येतात त्या केवळ प्रवासी आणि सामान आणण्यासाठी येतात.
रेल्वे स्थानकावर ४ ट्रॅक आणि ३ प्लॅटफॉर्म
संपूर्ण राज्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असूनही बैराबी रेल्वे स्टेशन हे हायटेक नाही. अनेक आधुनिक सेवासुविधा नसलेले हे रेल्वे स्टेशन अगदी साधे आहे. या रेल्वे स्थानकाचा कोड BHRB असा असून तिथे केवळ तीन प्लॅटफॉर्म आहेत. या रेल्वे स्थानकावर ट्रेन जाण्या-येण्यासाठी चार ट्रॅक आहेत.
या रेल्वे स्थानकाचे नंतर झाले रिडेव्हलपमेंट
पूर्वी हे रेल्वे स्थानक खूप लहान होते. पण नंतर २०१६ मध्ये एका मोठ्या रेल्वे स्थानकात रूपांतरित करण्यासाठी रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेण्यात आला, यानंतर त्यावर अनेक सुविधा वाढविण्यात आल्या. तसेच येत्या काळात येथे आणखी एक रेल्वे स्थानक बांधण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.