परदेशात जाण्यासाठी आपल्याकडे व्हिसा आणि पासपोर्ट असणे बंधनकारक असते. भारतातून इतर कोणत्याही देशात प्रवास करत असाल तरी मग ते विमान असो, ट्रेन असो वा जहाज, तुमच्याकडे व्हिसा पासपोर्ट असणे गरजेचेच आहे. पण तुम्हाला माहित आहे का, भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे, जिथून ट्रेन पकडण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा पासपोर्ट असणे गरजेचे आहे. आता तुम्ही विचार करत असा की, भारतीय रेल्वेने प्रवास करताना व्हिसा आणि पासपोर्टची गरज का लागते. पण यामागे खूप मोठं कारण आहे. नेमकं हे कारण काय आणि हे रेल्वे स्टेशन कुठे आहे जाणून घेऊ…

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर

हे रेल्वे स्टेशन पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे. या अटारी स्टेशनवरुन पाकिस्तानला ट्रेन धावतात, त्यामुळे देशातील हे एकमेव स्टेशन आहे जिथे व्हिसा लागू आहे. जर व्हिसाशिवाय तुम्ही येथे पोहोचलात तर स्टेशनवर पकडल्यानंतर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. हा मुद्दा भारत-पाकिस्तान संबंधित असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव येथे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. अनेक चित्रपटांचे चित्रिकरणही याठिकाणी झाले आहे.

दिल्ली किंवा अमृतसरहून पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाणाऱ्या गाड्या अटारी स्टेशनवरून जातात. दोन्ही देशांमधील नागरिकांसाठी भारत आणि पाकिस्तानदरम्यान या रेल्वे धावतात. यामध्ये समझौता एक्स्प्रेसचाही समावेश आहे. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानशी बिघडलेल्या संबंधांमुळे ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती.

अटारी स्टेशनवर जबरदस्त सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. यामुळे या स्थानकावर पोर्टरला राहण्याची परवानगी नाही, सामान कितीही जड असले तरी ते तुम्हाला एकट्याला उचलून न्यावे लागते.

अटारी स्टेशनवर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय पकडल्यास व्यक्तीला १४ फॉरेन ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो, म्हणजेच व्हिसाशिवाय आंतरराष्ट्रीय हद्दीत पकडला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात.