Indian Railway Diamond Crossing: प्रत्येक भारतीय व्यक्तीने कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेल. देशभर पसरलेले रेल्वेचे जाळे पाहून आपल्याला नेहमी आश्चर्य वाटते. रेल्वेच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आकर्षण वाटते. इतकी मोठी यंत्रणा काम कशी करते, न थांबता वर्षानुवर्ष ही सेवा अविरत कशी सुरू आहे अशा बऱ्याच गोष्टींचे आपल्याला नवल वाटते. अशाच एका आकर्षक गोष्टीची माहिती फार कमी जणांना असेल. ती म्हणजे डायमंड क्रॉसिंग.
भारतीय रेल्वेची एक अशी जागा आहे, जिथे चारही बाजूने ट्रेन येते. या अनोख्या क्रॉसिंगला डायमंड क्रॉसिंग म्हटले जाते. इथे इकाच जागेवरून रेल्वेचे चार रुळ जातात. ज्यामुळे इथे डायमंड प्रमाणे आकार तयार होतो. यामुळेच या जागेला डायमंड क्रॉसिंग म्हटले जाते.
आणखी वाचा- फेविकॉल ज्या बाटलीत असतो त्या बाटलीला का चिकटत नाही? हे आहे खरं कारण
कुठे आहे डायमंड क्रॉसिंग?
विशेष बाब म्हणजे भारतात डायमंड क्रॉसिंग फक्त एकाच ठिकाणी आहे. ते ठिकाण महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आहे. नागपूरमधील संप्रीति नगर स्थित मोहन नगरमध्ये हे डायमंड क्रॉसिंग आहे. इथे कोणालाही जास्त वेळ उभ राहण्याची परवानगी नसते. देश-विदेशातून अनेकजण डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी या जागेला भेट देतात.
आणखी वाचा- ATM Card: एटीएम कार्डवरील १६ अंकांचा अर्थ काय असतो? जाणून घ्या
चार दिशांमधून येणारे रुळ
चार दिशांमधून येणाऱ्या या रुळांवर वेगवेगळ्या रेल्वेचे मार्ग आहेत. पुर्व दिशेला गोंदियाहून येणाऱ्या रुळाचा हावडा-राउरकेला-रायपुर हा मार्ग आहे. एक रुळ दिल्लीहून आलेले आहे, तर एक दक्षिण भारतातून आलेले आहे. या जागेवर एकावेळी ट्रेन येउन अपघात होणार नाही याची काळजी रेल्वे यंत्रणेकडुन घेतली जाते.