what is difference between train coach and bogie: प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा व सुखकर होण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. फर्स्ट एसी ते जनरल डब्यापर्यंत प्रत्येक वर्ग आपापल्या परीने प्रवास करू शकतो. मात्र, तुम्हाला बोगीने प्रवास करायचा आहे की कोचने, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आता तुम्ही म्हणाल ही रेल्वेची ‘बोगी आणि कोच’ काय भानगड आहे? प्रवास तर रेल्वेनेच करायचा असतो ना! तर मित्रांनो, इथेच अनेकांची फसगत होते, अनेकांना याबद्दलची सविस्तर माहिती नसल्याने कोचला बोगी म्हणतात आणि बोगीला कोच म्हणतात. तर हाच आपला संभ्रम दूर करण्यासाठी ही महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, वाचा मग….
‘कोच’ म्हणजे नेमकं काय?
खरतंर कोच आणि बोगी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोकं कोचला बोगी म्हणतात, पण हे चुकीचे आहे. रेल्वेच्या ज्या डब्यात आपण प्रवास करता त्याला कोच म्हणतात. यामध्ये स्लीपर, एसी टियर १, एसी टियर २, एसी टियर ३ आणि जनरल असे डब्बे असतात. मात्र, अनेकजण बोगीलाच कोच म्हणून संबोधतात, जे चुकीचं आहे.
(हे ही वाचा : अहो आश्चर्यम! देशातील ‘या’ रेल्वे स्थानकावर दररोज प्रवाशी तिकीटं खरेदी करतात, पण प्रवास कोणीच का करत नाहीत? )
बोगी म्हणजे नेमकं काय?
बोगी हा रेल्वे कोचचा एक भाग आहे, ज्यावर डबा बसतो. तुम्हाला दिसणारी रेल्वेची चाके एका बोगीला जोडलेली असतात. बोगी तयार करण्यासाठी चार ते सहा चाके एका एक्सलला जोडलेली असतात, ज्यावर संपूर्ण डबा बसलेला असतो. साधारणता एका कोचमध्ये दोन बोगी असतात.
‘हे’ सुध्दा जाणून घ्या थोडक्यात
बोगी आणि कोच यामध्ये आणखी फरक सांगता येईल. जसं की, चालती रेल्वे थांबवण्यासाठी बोगीमध्येच ब्रेक लावले जातात. रेल्वेच्या प्रत्येक चाकावर ब्रेक बसवलेले असतात, ज्यामुळे संपूर्ण रेल्वे कोणत्याही अडचणीशिवाय एकाच वेळी थांबवता येते.
तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला कोच आणि बोगी यामधील फरक समजावून सांगितला. तेव्हा आपण आधुनिकतेच्या युगात नेहमी अपडेट रहा त्याचबरोबर सावध रहा आणि सुरक्षित राहा.