भारतीय रेल्वे नेटवर्क वाढवण्याबरोबरच तंत्रज्ञानावरही विशेष काम करत आहे. आता ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लोकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होत आहे. ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत, ज्यात अनेक वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वेतील टॉयलेटमध्येही बरेच बदल दिसून येत आहेत. पूर्वीच्या टॉयलेट्सच्या जागी आता अतिशय आधुनिक टॉयलेट्स रुम तयार करण्यात आले आहेत. आता ट्रेन्समध्ये बायोटॉयलेट्स फिट करण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यातील फ्लश सिस्टीममध्येही खूप बदल करण्यात आले आहेत. आता अनेक ट्रेन्समधील टॉयलेट्समध्ये इमर्जन्सी फ्लश बटण देण्यात आले आहेत.

अनेक ट्रेनमध्ये इमर्जन्सी फ्लश बटण आणि नॉर्मल फ्लशसाठी दोन बटणं देण्यात आली आहेत. दोन्ही फ्लश बटणांचा कसा वापर करायचा आणि इमर्जन्सी फ्लश बटण नेमके कसे काम करते हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग, या दोन्ही फ्लश बटणांचा वापर नेमका कसा करायचा जाणून घेऊ…

Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
india hyperloop track ready
मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?
Police scolded truck driver for writing shayari on truck viral video on social media
तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं
Indian Railways Shocking Video
ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये दिसणाऱ्या दोन बटणांपैकी एका बटणाच्या खाली ‘इमर्जन्सी फ्लश बटण’ आणि दुसऱ्या बटणाच्या खाली ‘फ्लशसाठी वापरा’ असे लिहिले असते. या दोघांचा वेगवेगळ्या कारणासाठी वापर केला जातो. दुसरे बटण नॉर्मल फ्लश यूजसाठी आहे, ज्याचा वापर लोक अनेकदा टॉयलेटचा वापर केल्यानंतर करतात. त्याच वेळी टॉयलेट चोकअप झाल्यास इमर्जन्सी फ्लश बटणचा वापर केला जातो. खरंतर, बरेच लोक टॉयलेटमध्ये टिश्यू पेपर किंवा इतर कचरा टाकतात, ज्यामुळे तो टॉयलेटच्या कमोडमध्ये अडकून राहतो.

अशा परिस्थितीत टॉयलेट जॅम झाल्यानंतर इमर्जन्सी फ्लश बटण वापरले जाते. या फ्लशचा वापर करून, अडकलेला कचरा हाय व्हॅक्यूम आणि पाण्याने काढून टाकता येतो आणि टॉयलेट पुन्हा वापरण्यायोग्य बनवता येते. अशी परिस्थिती तुमच्यावर कधी आली तर तुम्ही या दोन्ही फ्लशचा वापर करू शकता.

एका फ्लशमध्ये किती पाणी असते?

साधारणपणे, घरातील टॉयलेट फ्लश एक बटण प्रेस केल्यावर ०३ लिटर पाणी बाहेर येते. पण, ट्रेनच्या बाबतीत ते वेगळे आहे आणि ते एका खास पद्धतीने बनवले जातात. रिपोर्ट्नुसार, एसी कोचच्या टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर ०५ लिटर किंवा ०८ लिटर पाणी बाहेर येते.

Story img Loader