भारत हा विकसनशिल देश. विकासाच्या वाटेवर मोठ्या गतीनं देशाची घोडदौड सुरू आहे. अनेक क्षेत्रात विकासाच्या नव्या वाटा रूंदावत आहेत. त्यात भारतीय रेल्वेने नावलौकीक केले असून जगातलं चौथं मोठं रेल्वेचं जाळं हे भारतातच आहे. भारतीय रेल्वे बरोबरच आता मेट्रो, लोकल्स आणि इतकंच नव्हे तर बुलेट ट्रेन येऊ घातली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळ विखुरलेलं आहे. मात्र, देशातलं ‘हे’ असं एकमात्र राज्य आहे जिथे फक्त एक रेल्वे स्टेशन असून लाखो लोकांच्या प्रवासाचे हे एकमेव साधन आहे. भारताच्या ‘या’ राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. वाचून बसलाना धक्का ? होय! पण हे खरं आहे, मग वाचा तर पूर्ण बातमी…
भारताचं यश की अपयश?
गेल्या १७० वर्षात रेल्वेची सेवा प्रचंड बदलली आहे. मेट्रोसारखे आधुनिक प्रकल्प भारतात यशस्वी झाले आहेत. अनेक महानगरांमध्ये लोकल्सचं जाळं तयार झालं आहे. आता भारतात नवीन बुलेट ट्रेन येऊ घातलीय. देशभरात रेल्वेनं आपलं जाळं विनलंय खरं मात्र, देशाच्या फक्त एका राज्याचा विसर पडला की काय? ‘या’ राज्यात अजूनही रेल्वे सेवा पोहोचू शकली नाही. ‘या’ राज्यासोबत असे रोज घडते, इथं एकच रेल्वे स्टेशन आहे आणि या स्टेशन नंतर रेल्वे लाईन संपते. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याच स्टेशनवरून लोक कसे येतात आणि जातात? हे भारताचं यश आहे की अपयश? हाच मोठा प्रश्न पडलाय.
जगातलं चौथं मोठं रेल्वेचं जाळं भारतात
IBEF.ORG च्या अहवालानुसार भारतात एकूण २२ हजार ५९३ रेल्वे धावतात. यामध्ये ९ हजार १४१ मालगाड्यांचा समावेश आहे, तर १३ हजार ४५२ रेल्वेमधून लोकं प्रवास करतात. दररोज जवळपास २४ दशलक्ष लोकं रेल्वेमधून प्रवास करतात.
(हे ही वाचा : घराच्या छतावरील पाण्याची टाकी गोलच का असते? अन् त्यावर रेषा का असतात? ‘हे’ आहे यामागचं खरं कारण )
‘या’ राज्यात आहे फक्त एकच रेल्वे स्टेशन
भारताच्या शेवटच्या टोकाला असलेले ‘मिझोराम’ हे एकमेव रेल्वे स्टेशन असलेले राज्य आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव ‘बैराबी रेल्वे’ स्थानक आहे. राज्यात दुसरे कोणतेही रेल्वे स्थानक नसल्याने प्रवाशांना ‘या’ एकाच रेल्वेने प्रवास करावा लागतो. साधारणपणे असे म्हटले जाते की, हे स्थानक देखील येथील शेवटचे रेल्वे स्थानक आहे, त्यानंतर रेल्वे मार्ग संपतो.
सर्वकाही एकाच स्टेशनवरून
‘मिझोराम’ राज्यात बैराबी रेल्वे स्थानक सामान्य पद्धतीने बांधण्यात आले असून, त्यात आधुनिक सुविधांचा अभाव आहे. या रेल्वे स्थानकाचा कोड BHRB असून ते ३ प्लॅटफॉर्मचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी ४ ट्रॅकही आहेत. या छोट्या स्टेशनचे २०१६ मध्ये मोठ्या रेल्वे स्थानकात रूपांतरित करण्यासाठी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. यानंतर त्यावर अनेक सुविधाही वाढवण्यात आल्या. भविष्यात येथे दुसरे रेल्वे स्थानक बांधण्याचे, प्रस्तावही मांडण्यात आलं आहे.