Indian Railway Facts: भारतीय रेल्वेचे जाळे जितके विस्तृत आहे तितक्याच रंजक गोष्टी व इतिहास या प्रणालीला लाभला आहे. अगदी रेल्वेच्या रुळापासून ते शेकडो स्टेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीशी संबंधित काही ना काही विशेष बाबी असतात ज्या बहुधा आपण ऐकल्या नसतील. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, इतक्या ट्रेन व त्याचे शेकडो कोच या सर्वाचा भारतीय रेल्वे हिशोब कसा ठेवते? म्हणजे कोणता डब्बा कधी बनवला? आता त्याचं स्टेटस काय हे सगळं रेकॉर्डमध्ये कसे ठेवले जाते? तर याचं सोप्पं उत्तर असलेला सिक्रेट नंबर आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक ट्रेनवर उघडपणे काही चिन्हे, अक्षरे, अंक असतात. अशाच क्रमांकावरून भारतीय रेल्वेला ट्रेनच्या डब्ब्यांची स्थिती समजते.
ट्रेनचा क्रमांक म्हणजे ट्रेनच्या नावासह जोडलेला क्रमांक नव्हे तर असा नंबर जो ट्रेनच्या कोचवर लिहिलेला असतो. यावरून तुम्हाला अनेक गोष्टी समजू शकतात. जसे की, पहिले दोन आकडे कोणत्या वर्षी कोच बनवले गेले ते दर्शवतात. इतर तीन अंक कोचचा प्रकार दर्शवतात. आपण काही उदाहरणे पाहूया…
- 001-025: AC प्रथम श्रेणी
- 026-050: 1st AC + AC-2T
- 051-100: AC 2T
- 101-150: AC 3T
- 151-200: AC चेअर कार
- 201-400: स्लीपर दुसरा वर्ग
- 401-600: सामान्य द्वितीय श्रेणी
- 601-700: 2L सिटिंग जन शताब्दी चेअर कार
- 701-800: सिटिंग कम लगेज
- 801+ : पँट्री कार, VPU, RMS मेल कोच, जनरेटर कार इ.
काहीवेळा या कोडच्या पुढे ‘A’ किंवा ‘AB’ अशी चिन्हे असतात. विशेषत: व्हॅक्यूम ब्रेकमधून अपग्रेड केलेल्या कोचसाठी ‘C’ किंवा CBC जोडले जाते. आता याशिवाय ट्रेनवर काही वेळा सहा अंकी ट्रेनचे नंबर देखील असतात. यामध्ये पहिला अंक हा एक उपसर्ग आहे जो झोनल कोड दर्शवतो. जसे की 1 हा अंक सूचित करतो की हा डबा मध्य रेल्वे क्षेत्राचा आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक झोनचा विशिष्ट कोड असतो, जसे की दक्षिण पूर्व रेल्वेसाठी 8, पूर्व रेल्वेसाठी 5, ईशान्य सीमावर्ती रेल्वेसाठी 3 इत्यादी.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा!