Concession For Students: भारतीय रेल्वे हे जगभरातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. भारतीय रेल्वेने दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. सर्वात स्वस्त व तितक्याच सोयीचं असं हे वाहतुकीचं जाळं मानलं जातं. अगोदरच सामान्य व मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वेच्या तिकीट भाड्याचे दर आखण्यात आले आहेत पण त्यातही सोयीसाठी दरवर्षी रेल्वेतर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांना खास सवलती सुद्धा दिल्या जातात. आज आपण रेल्वेतर्फे विद्यार्थ्यांना काय व कशी सवलत दिली जाते याविषयी जाणून घेणार आहोत.
२०२० मार्च मध्ये विनातिकीट प्रवासनाच्या वाढत्या संख्येला कंटाळून अखेरीस रेल्वेने सर्व सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता मात्र अलीकडेच विशेष निवडक गटांसाठी रेल्वे तिकिटावर सवलत पुन्हा सुरु करण्याचे ठरवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना तब्बल ११ गटांमधून रेल्वेच्या या सवलतीचा लाभ घेता येऊ शकतो.
भारतीय रेल्वे शयनकक्ष (स्लीपर कोच) मध्ये तिकिटावर सूट दिली जाते. IRCTC तर्फे त्यांना प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी तिकिटाचे पैसे काही प्रमाणात रिफंड केले जातात. डिजिटल स्वरूपात तुम्हाला ऑनलाईन बँक ट्रान्स्फर करून रेल्वेतर्फे रिफंड केले जाते. लक्षात घ्या ही सूट प्रत्यक्ष काढलेल्या तिकिटांवर उपलब्ध आहे व ई- तिकीट यात समाविष्ट नाही.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीच्या स्लीपर कोच मध्ये जवळपास ५०% पर्यंत सूट मिळू शकते. तर महिन्याच्या व तिमाही पाससाठी शुद्ध ५० % सूट घेता येऊ शकते. दुसरीकडे या दोन्ही पद्धतीच्या तिकिटावर एससी/ एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तब्बल ७५ टक्के सूट दिली जाते.
जातीनिहाय सवलतींशिवाय काही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रेल्वेच्या खास सावलीत आहेत. जसे की, यूपीएससी (UPSC), SSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सेकंड क्लास मध्ये तिकिटावर ५०% सवलत मिळू शकते. तसेच ३५ वर्षावरील विद्यार्थी हे संधोधन किंवा पीएचडीचे अभ्यासक आहेत त्यांना सेकंड व स्लीपर कोचमध्ये ५०% सूट मिळू शकते. अधिक माहितीसाठी चला आपण तक्ता पाहूया…
हे ही वाचा<< भारतीय रेल्वेची ‘ही’ ट्रेन १०, २० नव्हे तर तब्बल १११ स्टेशनवर थांबते; बुकिंग करण्याआधीच जाणून घ्या माहिती
दरम्यान, रेल्वेच्या सवलतींविषयी खास गोष्ट म्हणजे ही सूट केवळ भारतीय विद्यार्थ्यांनाच नव्हे तर परदेशी विद्यार्थ्यांना सुद्धा मिळते. भारतात राहणारे परदेशी विद्यार्थी सुद्धा रेल्वेच्या तिकिटावर सेकंड व स्लीपर कोचमध्ये प्रवासासाठी ५०% सूट मिळवू शकतात. ताईच सुट्टीच्या दिवसांमध्ये भारतातील ऐतिहासिक स्थळी भेट देण्यासाठी आलेले विद्यार्थी सुद्धा या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.