Indian Railway Unknown Facts: भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी रोज प्रवास करत असले तरी आजही ट्रेनच्या सीटपासून ते स्टेशनपर्यंत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण ऐकल्याही नसतील. जसे की, तुम्हाला माहितेय का, भारतात अशी काही रेल्वे स्थानके व मार्ग आहेत जे दोन राज्यांना जोडण्याचे काम करतात. आज आपण अशाच एका ऐतिहासिक रेल्वे स्थानकाची माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार या रेल्वे लाईनचे स्टेशन एका राज्यात आहे तर लूप लाईन एका दुसऱ्या राज्यात आहे. एवढंच नाही तर दोन्ही राज्यात या एकाच स्टेशनचे बोर्ड सुद्धा लावण्यात आले आहेत.
तुम्हाला कल्पना असेलच की भारतीय रेल्वेची सुरुवात ही ब्रिटिश काळात झाली होती. त्याकाळी बनवलेली काही रेल्वे स्थानके आता राज्य विभाजनानंतर विभागली गेली आहेत. असेच एक स्थानक म्हणजे बिहार व झारखंड यांना जोडणारा दिलवा रेल्वे स्टेशन. २०० साली जेव्हा बिहार व झारखंड ही दोन वेगळी राज्ये झाली तेव्हा या रेल्वे स्टेशनचे नाव दोन्ही राज्यांमध्ये विभागले गेले. कोडरमाच्या दिलवा रेलवे स्टेशनची मेन लाइन झारखंड मध्ये आहे तर स्टेशनचे प्लॅटफॉर्म व लूप लाईन हे बिहारमध्ये आहे. मागील २३ वर्षांपासून या स्थानकातून दोन्ही राज्यांचे प्रवासी प्रवास करत आहेत.
दरम्यान, दोन राज्यांच्या सीमा जोडणारा ही रेल्वे लाईन तितकीच चिंतेचा विषयही ठरत आहे. बिहार व झारखंड या दोन्ही राज्यांच्या आरपीएफ व जीआरपी गटांमध्ये याच सीमा संभ्रमावरून अनेकदा वाद झाला आहे. विशेषतः आपत्कालीन व दुर्घटनेच्या स्थितीत या वादामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे.
हे ही वाचा<< मुंबई लोकल ते एक्सप्रेस ट्रेनवरील ‘या’ तिरप्या रंगीत रेषा आहेत खूप महत्त्वाच्या! भारतीय रेल्वेनेच सांगितलं कारण
महाराष्ट्रातही आहे असे खास रेल्वे स्टेशन
दुसरीकडे, महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यामध्ये नवापूर हे छोटे शहर आहे. नवापूर पंचायत या शहराचा कारभार पाहते. या शहरातून जाणारा रेल्वे मार्ग गुजरातमध्ये जातो. नवापूर रेल्वे स्थानक अगदी महाराष्ट्र गुजरात सिमेवर असल्याने त्याचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या सिमेत आहे तर अर्धा गुजरातच्या.