Indian Railways Highest Revenue Generating Train : भारतीय रेल्वेने दररोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. यासाठी दररोज हजारो रेल्वे गाड्या रुळांवरुन धावतात. यामुळे भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क बनले आहे. आजच्या घडीला सर्वात जलद आणि सोयीस्कर प्रवासासाठी लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देताना दिसतात. प्रवासबरोबर माल वाहतूकीसाठीही लोक रेल्वेवर अवलंबून असतात. यामुळे विविध मार्गाने रेल्वेच्या महसूलात मोठ्या प्रमाणात भर पडते.
दरम्यान प्रवाशांसाठी राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत या सुपरफास्ट गाड्यांव्यतिरिक्त, मेल एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन, लोकल, डीएमयू अशा अनेक रेल्वे गाड्या सेवेत आहेत ज्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवतात. यातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालवाहतूक केली जाते.
याच ट्रेन्सच्या तिकीट्स आणि मालवाहतुकीतून भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात पैसा कमावते. प्रत्येक ट्रेनची स्वत:ची एक ओळख आहे. ज्यामुळे ती ओळखली जाते. जसे की, वंदे भारत ही सर्वात सुपरफास्ट ट्रेन म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे भारतील रेल्वेला सर्वाधिक कमाई करुन देणारी ट्रेन म्हणून एक ट्रेनचे नाव घेतले जाते. भारतीय रेल्वेला सर्वाधिक आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या या ट्रेनचं नाव काय आहे, याविषयी आपण जाणून घेऊ..
रेल्वेला सर्वाधिक आर्थिक नफा मिळवून देणारी ट्रेन कोणती?
तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की, नव्याने सुरु झालेली वंदे, तेजस एक्स्प्रेस किंवा शताब्दी एक्स्रेस सारख्या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करणाऱ्या असतील, पण नाही, तुमचा अंदाज चुकीचा आहे. वंदे भारत किंवा तेजस नाही तर राजधानी एक्सप्रेस ही कमाईच्या बाबतीत सर्वात आघाडीवरील ट्रेन आहे. भारतातील सर्व ट्रेन्सपैकी या ट्रेनमधून रेल्वे सर्वाधिक महसूल मिळतो.
बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस कमाईच्या बाबतीतल अव्वल आहे. 22692 असा या ट्रेनचा क्रमांक आहे, बंगलोर राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन ते KSR बेंगळुरू असा प्रवास करते.साल २०२२ ते २३ या दरम्यान राजधानी एक्स्प्रेसने एकूण ५०९५१० प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला. त्यामुळे सुमारे १,७६,०६,६६,३३९ रुपये रेल्वेच्या खात्यात जमा झाले.
सिलायदह ही रेल्वेची दुसरी सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीशी जोडणारी या ट्रेनने २०२२-२३ मध्ये १,२८,८१,६९,२७४ रुपयांची कमाई केली. या काळात ५, ०९,१६४ प्रवाशांनी प्रवास केला. १२३१४ असा या ट्रेनचा क्रमांक आहे,
यानंतर दिब्रुगडची राजधानी ही कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाची ट्रेन आहे. नवी दिल्ली ते दिब्रुगडदरम्यान धावणाऱ्या या ट्रेनने २०२२ – २३ मध्ये या ट्रेनमधून ४,७४,६०५ प्रवाशांनी प्रवास केला, ज्यातून रेल्वेने १,२६,२९, ०९,६९७ रुपयांची कमाई केली.