देशभरातील लाखो प्रवासी रोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम भारतीय रेल्वेच्या माध्यमातून केले जाते. यामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्क्सपैकी एक आहे. सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक जण रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. यामुळे भारतीय रेल्वे प्रवासी सुविधा वाढवण्यावर आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणार भर देत आहे. यात प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक ट्रेन्स दाखल होत आहेत. पण भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन्सना नावे कशी दिली जातात? याबद्दल माहिती आहे का? जाणून घेऊ…
ट्रेन्सना नावे कशी दिली जातात?
भारतीय रेल्वेमध्ये प्रत्येक ट्रेनला एक विशेष नाव दिले जाते. यासाठी रेल्वेकडून एक पद्धत फॉलो केली जाते. ट्रेनचा प्रवास जिथून सुरू होते आणि जिथे संपतो त्या ठिकाणांची नावे ट्रेनला दिली जातात. उदा. चेन्नई-जयपूर एक्सप्रेस, कोटा-पटना एक्सप्रेस.
या व्यतिरिक्त काही ट्रेन्स ठरावीक जिल्ह्यांपुरत्या मर्यादित असतात, त्यामुळे त्या ट्रेन्सना प्रसिद्ध लोकेशन्स किंवा धार्मिक स्थळांवरून नाव दिले जाते. जसे की, काशी विश्वनाथ एक्सप्रेस, वैशाली सुपरफास्ट एक्सप्रेस. त्यामुळे संबंधित धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणांची नावे ट्रेन्सना दिली जातात.
राजधानी एक्सप्रेस हे नाव कसे पडले?
कोणत्याही ट्रेनचे नाव तिची खासियत लक्षात घेऊन ठेवले जाते. उदाहरणार्थ, दोन राज्यांच्या राजधान्यांना जोडणाऱ्या ट्रेनला राजधानी एक्सप्रेस म्हणतात. राजधानी एक्सप्रेस दोन राज्यांच्या राजधान्यांमध्ये धावते. भारतील अव्वल दर्जाच्या ट्रेन्समध्ये राजधानी एक्सप्रेसचा समावेश होतो. या ट्रेन्सचा वेळ आणि सुविधा दर्जेदार असतात. तसेच त्या प्रतितास १४० किलोमीटर वेगाने धावतात.
शताब्दी एक्सप्रेस हे नाव कसे ठरले?
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शताब्दी एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली. म्हणूनच तिला ‘शताब्दी एक्स्प्रेस’ असे नाव देण्यात आले. ही ट्रेन प्रतितास १६० किलोमीटर वेगाने धावते.
बंगालीमधील दुरांतो एक्सप्रेस ही सर्वात कमी स्टेशनांवर थांबते. दुरांतोचा अर्थ विनाअडथळा. त्यामुळे या ट्रेनला दुरांतो म्हटले जाते. या ट्रेनचा प्रतितास वेग १४० किलोमीटर आहे. म्हणूनच याला ‘दुरांतो एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले.