Indian Railway Rules: देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं; त्यामुळेच भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. एका दिवसात लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे हा भारतीयांच्या सर्वात जवळचा व आपुलकीचा विषय आहे. पण, या रेल्वेविषयी अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या कदाचित आपल्यालाही माहिती नसतील. रेल्वेचे प्रवाशांसाठी अनेक नियम आहेत. पण, त्याविषयी प्रवाशांना फार कमी माहिती असते. रेल्वेतून रोजचा प्रवास करताना आपणाला रेल्वेचे प्रत्येक नियम माहिती असतात असे नाही. त्यातीलच एका नियमाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याविषयी तुम्हालाही माहिती नसेल.

देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग वाहतुकीची इतर साधने उपलब्ध असूनही रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रवासासाठी करतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी अनेक नियम केले आहेत. रेल्वेकडून ज्याप्रकारे सुविधा दिल्या जातात, त्याचप्रकारे प्रवाशांना प्रवास करण्यासंदर्भातही काही नियम दिले आहेत. प्रवाशांना रेल्वेच्या या नियमांचे पालन करूनच प्रवास करावा लागतो.

Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
railway passengers issues, railway passenger association, election campaign,
प्रचारात आम्ही आहोत कुठे ? रेल्वे प्रवासी, संघटनांचा उमेदवारांना प्रश्न
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

(हे ही वाचा: रेल्वे तिकीट असतानाही प्रवाशाला टीटी रेल्वेतून उतरवणार, कारण काय? रेल्वेचा ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का? )

रेल्वे विभागातील एक प्रमुख पद म्हणून टीटीई पदाला ओळखले जाते. टीटीई म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एग्जामिनर (प्रवास तिकीट परीक्षक) टीटीईचे प्रमुख काम हे आहे की, रेल्वेमध्ये प्रवाशांची तिकिटे तपासणे. टीटीईचे काम तिकिटाशिवाय प्रवास करणार्‍या लोकांकडून दंड वसूल करणेदेखील आहे किंवा ते ट्रेनमधील रिकाम्या सीटबद्दलदेखील निर्णय घेऊ शकतात. पण टीटीई रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत झोपलेल्या प्रवाशाला तिकीट तपासण्यासाठी उठवू शकतात का, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? काय सांगतो रेल्वेचा नियम जाणून घेऊया…

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, “रेल्वेमध्ये सध्या लागू असलेल्या नियमांनुसार, शक्यतो तिकीट तपासणी ही सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजल्यापर्यंत करणे अपेक्षित आहे. परंतु ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री दहाच्या नंतर सुरू होतो किंवा गाडी रात्री दहाच्या नंतर सुरू होत असेल अथवा काही कारणांमुळे तिकीट तपासणी झालेली नसेल तर अशा प्रवाशांचे तिकीट हे रात्री १० नंतर देखील तपासले जाऊ शकते.”, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

त्याचप्रमाणे रेल्वेच्या नियमानुसार, रात्री प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या आवाजात संगीत ऐकण्यास आणि मोठ्याने बोलण्यास मनाई करण्यात आली असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे