Indian Railway Rule: दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात, काही फुकट्या प्रवाशांचा आत्मविश्वास इतका भन्नाट असतो की अनेकदा टीसीने पकडूनही मी कसा तिकीट काढत नाही ही शरमेने सांगायची बाब ते अभिमानाने मिरवतात. काहीजण टीसीला रडून, गयावया करून दंड माफ करायला लावतात आणि तिथून पुढे निघताच या महाशयांचा swag भलताच असतो. पण कधीकधी कुठलीच क्लुप्ती टीसी समोर चालत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही झाली एक बाजू पण काही वेळा खरोखरच प्रामाणिक चूकही होऊ शकते, जसे की, पास संपल्याचे लक्षात न राहणे, तिकीट काढताना गोंधळ होणे, तिकीट हरवणे. या व अशा अनेक समस्यांवर स्वतः रेल्वेने आपल्या साईटवर उपाय सांगितले आहेत. आज आपण रेल्वेचा असा नियम पाहणार आहोत ज्यात महिलांना टीसी कधी तिकीट विचारू शकत नाही हे सांगितलेले आहे.

तिकीट नसल्यास किती रुपये दंड आहे? (Without Ticket Journey Penalty)

रेल्वेच्या वेबसाईटनुसार जर आपल्याकडे तिकीट नसेल तर आपल्याला दंड भरण्यास सांगितले जाऊ शकते. ज्या स्टेशनवरून पॅसेंजरने ट्रेन पकडली आहे किंवा ट्रेन जिथून सुटली आहे, जिथे जाणार आहे या दोन्ही पॉइंट्सच्या मधील अंतरानुसार अतिरिक्त किंवा तिकिटाच्या रक्कमेसह अधिक २५० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

तिकीट नसल्यास टीसी अटक करू शकतात का?

जर तुम्ही अधिकृत तिकीट नसताना प्रवास केला आणि टीसीने पकडल्यावर दंड भरण्यास नकार दिला तर तुम्हाला कलम १३७ च्या अंतर्गत अटक केली जाऊ शकते.

हे ही वाचा<< Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “

…तर महिलांना टीसी तिकीट विचारू शकत नाही

रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच irail.In वर दिलेल्या माहितीनुसार, कोणतेही पुरुष तिकीट निरीक्षक काही ठराविक वेळी महिला प्रवाशांचे तिकीट तपासू शकत नाही. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी काही कोच राखीव असतात. यामध्ये पुरुषांना तिकीट तपासणीसाठी चढण्याची परवानगी नाही. जरी या महिलांकडे तिकीट नसेल तर केवळ महिला टिकत निरीक्षकच त्यांच्यावर कारवाई करू शकतात. लक्षात घ्या हा नियम केवळ महिलांसाठी राखीव असणाऱ्या ट्रेनच्या बोगीसाठीच मर्यादित आहे प्लॅटफॉर्मवर जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway tc can not ask ticket to women passenger in these cases how much in fine if travel without ticket check your rights svs