Train Fare Discount List : भारतीय रेल्वेकडून प्रत्येक वर्गानुसार सुविधा पुरवल्या जातात. यात गरजू लोकांनाही रेल्वेकडून काही खास सवलती दिल्या जातात. आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना ट्रेनच्या तिकीटात सूट मिळत असल्याचे आपण ऐकून आहोत. पण आजारी लोकांनाही रेल्वेकडून तिकीटात विशेष सूट दिली जाते. भारतीय रेल्वेकडून काही आजारांनी त्रस्त रुग्णांना तिकीट भाड्याच सवलत देण्याची तरतूद आहे. पण कोणत्या आजारांनी ग्रस्त रुग्णांनी तिकीटात सवलत मिळते जाणून घेऊ. ही बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरुन तुमच्या ओळखीच्या लोकांना या सवलतीसंदर्भात तुम्ही माहिती देऊ शकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मिळते सवलत?

१) कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्यासोबतच्या अटेंडंटना रेल्वे तिकीटाच सूट देण्याची तरतूद आहे. संबंधित रुग्ण जर कोणत्याही ठिकाणी उपचारासाठी जात असतील तर त्यांना AC चेअर कारमध्ये ७५ टक्के सूट मिळते. त्याचवेळी AC-3 आणि स्लीपर कोचमध्ये १०० टक्के सूट मिळते. तसेच फर्स्ट क्लास, सेकंड एसी क्लासमध्ये ५० टक्के सूट उपलब्ध आहे.

२) थॅलेसेमिया, हार्ट पेशंट, किडनी पेशंटनाही रेल्वे तिकीटात सवलत मिळते. हार्ट पेशंटना हृदय हार्ट सर्जरीसाठी आणि किडनी पेशंटना किडनी ट्रान्सप्लांटसाठी किंवा डायलिसिससाठी जात असल्यास भाड्यात सूट देण्याची तरतूद आहे. या स्थितीत AC-3, AC चेअर कार, स्लीपर, सेकंड क्लास, फर्स्ट एसीमध्ये ७५ टक्के सूट उपलब्ध आहे. यासोबतच रुग्णासोबत येणाऱ्या व्यक्तीलाही सूट मिळते.

३) यासोबतच हिमोफिलियाच्या रुग्णांना उपचारासाठी जाताना रेल्वे तिकीटात सवलत मिळते. या रुग्णांसोबत आणखी एका व्यक्तीलाही ही सूट मिळते. या लोकांना सेकंड क्लास, स्लीपर, फर्स्ट क्लास, AC-3, AC चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते.

४) टीबी रुग्णांना उपचारासाठी जाण्यासाठी तिकीटात सूट देण्याची तरतूद आहे. या रुग्णांना सेकंड क्लास, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये ७५ टक्के सूट मिळते. त्याचवेळी त्याच्या सोबतच्या व्यक्तीला देखील तिकीटात सूट दिली जाते.

५) कुष्ठरुग्णांनाही सेकंड क्लास, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये ७५ टक्के सवलत दिली जाते.

६) एड्सच्या रुग्णांना उपचारासाठी जाताना सेकेंड क्लासमध्ये ५० टक्के सवलत दिली जाते.

७) ऑस्टॉमीच्या रूग्णांना फर्स्ट आणि सेकंड क्लासमधील मंथली सेशन आणि क्वाटर सेशन तिकिटांमध्येही सवलत मिळते.

८) यासोबत अॅनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-3 टायर आणि एसी-2 टायरमध्ये ५० टक्के सूट दिली जाते.