Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. सर्वात स्वस्त आणि जलद प्रवासासाठी लाखो रोज रेल्वेचा पर्याय निवडतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतीय रेल्वे दररोज १३१६९ ट्रेन चालवते. यातून प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. इतक्या ट्रेन असूनही जर तुम्हाला शेवटच्या क्षणी कोणत्याही ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण काही वेळी तुम्हाला ट्रेनमध्ये पसंतीची सीट हवी असते तेव्हाही असेच काहीसे घडते. त्यामुळे आज आपण ट्रेनमध्ये कोणती सीट पहिला आणि कोणती सीट सर्वात शेवटी बुक होते हे जाणून घेणार आहोत.
ट्रेनमध्ये आवडती सीट कशी मिळवायची?
कोणत्याही ट्रेनमधील एकूण सीटची संख्या त्या ट्रेनच्या डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते. एका कोचमध्ये सरासरी ७२ ते ११० सीट्स असतात. थर्ड एसी आणि स्लीपर कोचमध्ये सीट्सचे पाच प्रकार असतात. पहिला लोअर बर्थ, दुसरा मिडल बर्थ, तिसरा वरचा बर्थ, चौथा लोअर बर्थ आणि पाचवा अपर बर्थ. यामध्ये कोणत्याही सीटवर बसून किंवा झोपून आपला प्रवास पूर्ण करायचा हे स्वत: निवडू शकतात. तुम्हाला तुमची पसंतीची सीट हवी असल्यास, तुमचे तिकीट बुक करताना तुम्हाला खालील एक गोष्ट करावी लागेल.
जेव्हा तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करत असाल, तेव्हा बुकिंगच्या वेळी सीट प्रेफ्रेन्स असा एक ऑप्शन येतो. यात तुम्ही तुमच्या आवडीची सीट बुक करू शकता. मात्र यावेळी तुम्ही आवडती सीट निवडल्यानंतरही तुम्हाला तीच सीट मिळेल, हे निश्चित नसते. तिकीट बुक करताना ट्रेनमध्ये अनेक सीट्स रिक्त असतील तरच तुम्हाला तुमची आवडती सीट्स मिळते.
ट्रेनमध्ये कोणती सीट पहिला आणि कोणती सर्वात शेवटी बुक होते?
भारतीय रेल्वेचे तिकीट बुकिंग सॉफ्टवेअर अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, तिकीट बुक करताना, ट्रेनमध्ये भार (वजन) समान प्रमाणात वितरीत होईल याची काळजी घेतली जाते. म्हणजे जेव्हा कोणी एखाद्या ट्रेनचे पहिले तिकीट बुक करते तेव्हा त्याला मधल्या कोचमध्ये सीट दिली जाते. ही सीट देखील केवळ लोअर बर्थची असते. एकूणच हे सॉफ्टवेअर अशा प्रकारे सीट बुक करते की, संपूर्ण ट्रेनमध्ये प्रवासी समान रीतीने वितरीत केले जातात. म्हणजे काही कोच पूर्ण भरलेले आणि काही कोचमध्ये फक्त १० किंवा २० प्रवासी आहेत असे होऊ नये, याची रेल्वे काळजी घेते.
बुकिंगच्या वेळी हे सॉफ्टवेअर देखील काळजी घेते की, प्रथम सीट कोचच्या मध्यभागी बुक केल्या जातील आणि नंतरच्या सीट्स कोचच्या शेवटी म्हणजेच गेटजवळच्या बुक होतील.