Indian Railways Facts: आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असेलच. काहींचे तर अर्ध्याहून अधिक आयुष्य हे ट्रेनच्या प्रवासातच जाते असेही गमतीत म्हणता येईल. आपल्या आयुष्यातील इतका वेळ या ट्रेनच्या डब्ब्यात घालवूनही अनेकदा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षातच आलेल्या नसतात. उदाहरणार्थ, तुम्हीही ट्रेनने प्रवास करताना वर लावलेले पंखे पाहिले असतील. पण याच पंख्याच्या बाजूला एका विशिष्ट स्वरूपात काही छिद्र असलेली जाळीसारखी डिझाईन असते हे कधी पाहिले आहे का? या जाळीचे काम काय व त्यामुळे प्रवाशांना नेमकी कशी मदत होऊ शकते हे आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेनमध्ये पंख्याच्या बाजूला छिद्रे का असतात?

ट्रेनमध्ये पंख्याच्या बाजूला असलेल्या जाळीला रूफ व्हेंटिलेटर असे म्हणतात. याचा उपयोग अत्यंत खास आहे. विज्ञानाचा एक खास नियम म्हणजे गरम हवा ही हवेच्या पट्ट्यात वरच्या बाजूला असते. त्यामुळे जेव्हा ट्रेनमध्ये गर्दी वाढते तेव्हा उत्सर्जनातून बाहेर पडणारी गरम हवा ही वरच्या बाजूने पसरत असते.

ही हवा जर ट्रेनच्या बाहेर पडली नाही तर कालांतराने यामुळे वातावरण दमट होऊ शकते व परिणामी गुदमरण्याचा धोका सुद्धा असतो. शिवाय ही हवा असल्यास पंखा चालू असूनही पुरेशी गार हवा आपल्याला लागतच नाही. म्हणूनच पंख्याच्या बाजूला ही गरम हवा बाहेर काढण्यासाठी छिद्र असणारी जाळी लावलेली असत . याला रूफ व्हेंटिलेटर सिस्टीम असे म्हणतात.

हे ही वाचा<< लग्न न करता हॉटेलमध्ये राहणाऱ्या कपलला पोलीस अटक करू शकतात का? कायदा सांगतो की…

तुम्हाला माहित असलेच की, यापूर्वी ट्रेनमधील पंखे व ट्यूबलाईट या विजेवर चालत नव्हते. पण य कारणाने अनेकदा चोरीचे प्रकार घडू लागले, यामुळेच रेल्वेने ११० वोल्ट डीसी करंटवर चालणार्या पंख्यांची व ट्यूबलाईटची सिस्टीम वापरणे सुरु केले. यासाठी ट्रेनमध्ये एक विशेष बॅटरी बॉक्स सुद्धा असतो. अशाच नवनवीन माहितीसाठी लोकसत्ताच्या FYI सेक्शनला भेट द्यायला विसरू नका.