भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. आरामदायी आणि स्वस्त प्रवासासाठी अनेकांची रेल्वे प्रवासाला पसंती असते. त्यामुळे कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेची निवड करतात. पण, तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेन एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकापर्यंत जाताना अनेकदा एकाच ट्रॅकवरून न जाता, ट्रॅक बदलून धावत असते. पण, ट्रेनने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा ट्रॅकमधील अंतर किती असते? तसेच काही ट्रॅक रुंद आणि काही अरुंद, असे का असतात? त्यामागे काय कारण आहे? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आज सविस्तर जाणून घेऊ.
रेल्वे गेज म्हणजे काय?
दोन ट्रॅकच्या आतील टोकामधील किमान अंतराला ‘रेल्वे गेज’ म्हणतात. म्हणजेच कोणत्याही रेल्वेमार्गावरील दोन ट्रॅकमधील अंतराला रेल्वे गेज, असे म्हणतात. जगातील सुमारे ६० टक्के रेल्वे वाहतुकीसाठी १,४३५ मिमीचा स्टँडर्ड गेज वापरतात. भारतात ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज व स्टँडर्ड गेज (दिल्ली मेट्रोसाठी), असे चार प्रकारचे रेल्वे गेज वापरले जातात.
ब्रॉडगेजला वाइड गेज किंवा मोठी लाइन, असेही म्हणतात. या रेल्वे गेजमध्ये दोन ट्रॅकमधील अंतर १६७६ मिमी (५ फूट ६ इंच) आहे. तर स्टँडर्ड गेज १४३५ मिमी (४ फूट ८-१/२ इंच)पेक्षा जास्त रुंद असलेल्या कोणत्याही गेजला ‘ब्रॉडगेज’, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
भारतात १८५३ मध्ये बांधलेली पहिली रेल्वे लाईन ही बोरीबंदर) (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाण्यापर्यंत बांधलेली ब्रॉडगेज लाइन होती.
या रेल्वे गेजमध्ये दोन ट्रॅकमधील अंतर १४५३ मिमी (४ फूट ८-१/२ इंच) आहे. भारतात मेट्रो, मोनो रेल व ट्राम यांसारख्या शहरी रेल्वे प्रणालींसाठीच स्टँडर्ड गेजचा वापर केला जातो. २०२१ पर्यंत भारतातील एकमेव मानक गेज लाइन कोलकाता (कलकत्ता) ट्राम सिस्टीममध्ये होती. शहरी भागात येणार्या सर्व मेट्रो लाईन फक्त स्टँडर्ड गेजमध्ये बांधल्या जात आहेत.
दोन ट्रॅकमधील अंतर १००० मिमी (४ फूट ३-३/८ इंच) आहे. खर्च कमी करण्यासाठी मीटर गेज लाइन्स करण्यात आल्या. निलगिरी माउंटन रेल्वे ही एकमेव मीटर गेज लाईन आहे. पण, आता भारतातील सर्व मीटर गेज लाइन्स प्रोजेक्ट युनिगेजच्या माध्यमातून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित केल्या जात आहेत.
लहान लाईनला नॅरोगेज, असे म्हणतात. नॅरोगेज रेल्वे हा एक रेल्वे ट्रॅक आहे; ज्यामध्ये दोन रुळांमधील अंतर २ फूट ६ इंच (७६२ मिमी) आणि २ फूट (६१० मिमी) आहे. २०१५ मध्ये १५०० किमी नॅरोगेज रेल्वेमार्ग होते; जे एकूण भारतीय रेल्वे नेटवर्कच्या सुमारे दोन टक्के मानले जात.