Indian Railways : भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज लाखो लोक या रेल्वेने प्रवास करतात. पण प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना जागा मिळत नाही. अशावेळी ट्रेन सोडण्यापलीकडे प्रवाशांकडे दुसरे कोणतेही ऑप्शन शिल्लक राहत नाही. यात कन्फर्म तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांना प्रवास करण्यात अडचणी येतात. गेल्या वर्षभरात कन्फर्म तिकीट न मिळाल्याने एक, दोन नव्हे तर तब्बल २.७० कोटी प्रवाशांना प्रवास करता आला नाही, अशी माहिती एका आरटीआयमधून उघड झाली आहे. या प्रवाशांनी तिकीट खरेदी केले होते, मात्र ते वेटिंग लिस्टमध्ये असल्याने त्यांचा पीएनआर नंतर आपोआप रद्द करण्यात आला. यापूर्वी २०२१- २२ या आर्थिक वर्षात कन्फर्म तिकीट न मिळाल्याने १.६५ कोटी प्रवाशांना प्रवास करता आला नव्हता.

२.७० कोटी प्रवाशांना करता आला नाही प्रवास

देशातील सर्वात व्यस्त मार्गांवर गाड्या उपलब्ध नसल्यामुळे गेल्या वर्षभरात एकूण २.७० कोटी प्रवाशांना वेटिंग तिकिटामुळे प्रवास करण्याची संधी मिळू शकली नाही. मध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी आरटीआयमधून विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे बोर्डाने म्हटले की, २०२२ – २३ या वर्षात २.७२ कोटी प्रवासी प्रवास करणार होते, मात्र १.७६ कोटी पीएनआर क्रमांक वेटिंगमध्ये असल्याने या प्रवाशांचे तिकीट आपोआप रद्द झाले. यापूर्वी २०२१-२२ या वर्षात १.०६ कोटी पीएनआर आपोआप रद्द करण्यात आले होते, यामुळे १.६५ कोटी प्रवासी रेल्वे प्रवास करू शकले नाहीत.

private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
advertisement boards indicators Dombivli railway station local train passengers
डोंबिवली रेल्वे स्थानकात जाहिरात फलकांमुळे इंडिकेटर दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
Indian Railway Highest Revenue Generating Train
Indian Railways : ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई १,७६,०६,६६,३३९; वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसलाही टाकले मागे
Online railway ticket purchases facility unavailable for disabled
अपंगांना ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग सुविधा केंव्हा मिळणार?
Problems faced by disabled passengers due to lack of online railway ticket purchase facility
ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड
Central railway special trains cancelled delayed
१० महिन्यात २०२ विशेष रेल्वेगाड्या रद्द, १ हजार १४६ विशेष गाड्यांना बिलंब
passenger and memu special trains running from cr bhusawal division of operated with regular numbers
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

Indian Railways: लहान मुलांच्या प्रवासाबाबत भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! आता प्रवास करणे आणखी आरामदायी होणार, कसे ते जाणून घ्या

भारतीय रेल्वेला भेडसावतेय वेटिंग तिकिटांची समस्या

वेटिंग लिस्टमध्ये असलेले पीएनआर रद्द होताच रेल्वे त्या तिकिटाची किंमत प्रवाशांना परत करते, मात्र तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय ही मोठी समस्या कायम आहे. भारतीय रेल्वे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्यात असमर्थ ठरत आहे.

काही वर्षांपूर्वी पीएनआर रद्द करण्याची संख्या फार कमी होती. अधिकृत आकडेवारीनुसार, २०१४- १५ मध्ये वेटिंग लिस्टमुळे १.१३ कोटी पीएनआर रद्द करण्यात आले. तर २०१५-१६ मध्ये ८१.०५ लाख, २०१६-१७ मध्ये ७२.१३ लाख, २०१७-१८ मध्ये ही संख्या ७३ लाख होती. पण २०१८-१९ मध्ये ६८ .९७ लाख पीएनआर वेटिंग लिस्टमुळे रद्द करण्यात आले.

२०२०-२१ मध्ये वेस्टिंग लिस्टमुळे रद्द झालेल्या ऑटो पीएनआरची एकूण संख्या ३८.८९ लाख होती, आणि याच पीएनआरवर ६१ लाख प्रवाशांनी तिकिटे बुक केली गेली. ही समस्या लक्षात घेता ट्रेनची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. यामुळे प्रवाशांचे वेटिंग लिस्टमध्ये येण्याचे प्रमाणही कमी होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोना महामारीपूर्वी भारतीय रेल्वेने १०, १८६ गाड्या चालवल्या होत्या, जी संख्या आता १०,६७८ वर पोहचली आहे. तरीही वेटिंग लिस्टमधील प्रवाशांचे तिकीट रद्द होण्याची समस्या मात्र कमी झालेली नाही. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रेल्वे नेटवर्क सिग्नलिंग आणि ट्रॅकवर काम सुरू आहे जेणेकरून अधिक गाड्या सेवेत दाखल केल्या जाऊ शकतात आणि प्रवाशांची गैरसोय टाळता येऊ शकते.

Story img Loader