तुमच्यापैकी अनेकजण भारतीय रेल्वेने प्रवास करत असतील, पण काहीवेळा प्रवाशांना ट्रेन उशीरा येणे किंवा रद्द होणे असा अनुभव येतो. अनेकदा थंडीच्या दिवसात धुके किंवा अतिमुसळधार पावसामुळे ट्रेनला उशीर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, ट्रेनला उशीर झाल्यास तुम्हाला तिकीटाची संपूर्ण रक्कम परत मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या या नियमांबद्दल सांगणार आहोत, कारण बहुतांश प्रवाशांना रेल्वेने प्रवास करताना नियमांची माहिती नसते. त्यामुळे ते रेल्वेच्या अनेक सेवांपासून दूर राहतात.

भारतीय रेल्वेने वेळेवर सर्व रेल्वे गाड्या धावण्यासाठी अनेक सुधारणा केल्या असल्या तरी अजूनही अनेक गाड्या वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

karjat Bhivpuri local trains disrupted
कर्जत – भिवपुरी येथील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत, कर्जतहून येणाऱ्या काही लोकल रद्द
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Karjat CSMT local services delayed morning Kalyan, Dombivli central railway local train services passengers
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ
Movement to resume Kisan Special Train services
किसान विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली
tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने

काय आहे रेल्वेचा नियम?

रेल्वेच्या नियमानुसार, जर ट्रेन कोणत्याही कारणाने रद्द झाली किंवा ३ तास किंवा त्याहून अधिक उशिराने धावत असेल तर प्रवाशाला पूर्ण पैसे परत मिळू शकतात. तसेच ट्रेन रद्द केल्यामुळे किंवा उशीर झाल्यामुळे तिकीट रद्द केल्यावर भारतीय रेल्वे प्रवाशांना पूर्ण परतावा देते. मात्र, बहुतांश प्रवाशांना याची माहिती नसते. जर तुम्ही काउंटवरून तिकीट घेतले असेल तर ते रद्द करण्यासाठी तुम्हाला आरक्षण काउंटरवर जावे लागते. तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाइन घेतले असल्यास तुम्ही आयआरसीटीसी वेबसाईटवरुन तिकीट रद्द करु शकता.

टीडीआर ऑनलाइन फाइल करा

जर तुमची ट्रेन चार्ट तयार केल्यानंतरही उशीरा होत असेल, तर तिकीट रद्द करण्यासाठी टीडीआर फाइल करा. जर तुम्ही तिकीट काउंटरवरुन तिकीट घेतले असेल, तर तुम्हाला तुमचे तिकीट प्रवासाच्या सुरुवातीच्या स्टेशनवर म्हणजेच तुमच्या बोर्डिंग स्टेशनवर सरेंडर करावे लागेल. यानंतर तुम्हाला परतावा मिळेल. टीडीआर ऑनलाइन भरून तुम्ही ई-तिकीटवर परतावा मिळवू शकता. पण परतावा येण्यासाठी किमान तीन महिने म्हणजे ९० दिवस लागतील.

ट्रेन रद्द झाल्यास रिफंड मिळतो आपोआप

याशिवाय भारतीय रेल्वेने कोणतीही ट्रेन रद्द केल्यास प्रवाशांना ऑटोमॅटिक प्रोसेसच्या माध्यमातून पूर्ण परतावा मिळतो. ऑनलाइन खरेदी केलेल्या ई-तिकीटाची रक्कम ३ ते ७ दिवसांत बँक खात्यात जमा होते. PRS (प्रवासी आरक्षण प्रणाली) काउंटर तिकिटांसाठी, प्रवाशांना संबंधित PRS काउंटरवरून परतावा घ्यावा लागेल. या परताव्याचा दावा करण्यासाठी, प्रवाशांना ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 3 दिवसांच्या आत तिकीट सरेंडर करावे लागेल.

Story img Loader