भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने प्रवाशाने काढलेले कन्फर्म रेल्वे तिकीटावर दुसऱ्या व्यक्तीस ट्रान्सफर करण्यास एक नवीन सुविधा सुरु केली आहे. यामुळे जर तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म रिजर्व्हेशन तिकीट असेल, पण काही कारणास्तव प्रवास करु शकत नसाल, तर तुम्ही ते तिकीट कुटुंबातील कोणत्याही सदस्याला ट्रान्सफर करू शकता. कोणत्याही सदस्याला म्हणजे केवळ कुटुंबातील वडील, आई, बहीण, भाऊ, मुलगी, मुलगा, पती किंवा पत्नी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा रेल्वे तिकीट बुक केल्यानंतर काही कारणास्तव प्रवासी प्रवास करु शकत नाही. अशावेळी एकतर त्याला तिकीट रद्द करावे लागते किंवा त्यांच्या जागी पाठवलेल्या व्यक्तीला नवीन तिकीट काढावे लागते. यावेळी कन्फर्म तिकीट मिळणे अनेकदा अवघडचं असते. त्यामुळेच रेल्वेने प्रवाशांसाठी ही नवीन सुविधा सुरु केली आहे. परंतु अनेक प्रवाशांना या सुविधेची माहिती नसल्याने ते याचा फायदा घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला या सुविधेचा लाभ कसा घ्यावा हे सांगणार आहोत.

ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी प्रवासी तिकीट ट्रान्सफरसाठी विनंती करू शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकिट ट्रान्सफरचा लाभ प्रति व्यक्ती एकदाच घेता येतो. तिकीटांचे ट्रान्सफर हे फक्त एकदाच केले जाऊ शकते. म्हणजे प्रवाशाने जर आपले तिकीट दुसऱ्या व्यक्तीला एकदा ट्रान्सफर केले असेल तर ते बदलू शकत नाही. म्हणजे आता तो हे तिकीट इतर कोणालाही ट्रान्सफर करु शकत नाही. यावेळी तिकीटावर प्रवाशाचे नाव कट होऊन ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रान्सफर केले गेले आहे, त्याचे नाव तिकीटावर दिले जाते.

सणासुदीचा, लग्नाचा प्रसंग किंवा कोणतीही वैयक्तिक समस्या असल्यास त्या प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या ४८ तास आधी तिकीट वाढवावे. NCC उमेदवारांना तिकीट हस्तांतरण सेवेचा लाभ देखील घेता येईल. जे प्रवाशी त्यांच्या समकक्षाची जागा घेतील त्यांना प्रवासासाठी त्यांची ओळख दस्तऐवज बाळगणे आवश्यक आहे.

महामार्गावरुन वाहन चालवताय? ३ सेकंदाचा नियम लक्षात ठेवा अन् स्वत:चा अपघातापासून बचाव करा; कसं ते जाणून घ्या

तुमचे तिकीट कसे ट्रान्सफर करावे?

१) सर्वप्रथम तिकिटाची प्रिंट-आउट काढा.

२) तुम्ही ज्या व्यक्तीला तिकीट ट्रान्सफर करू इच्छिता त्याचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र सोबत ठेवा.

३) तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरील तिकीट रिजर्व्हेशन काउंटरला भेट द्या.

४) आता तिकीट ट्रान्सफर काउंटरवर अर्ज करावा लागेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways irctc you can transfer the confirmed train ticket to your family member check steps to do so sjr