Indian Railways Rules: भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे मार्गांपैकी एक आहे. दररोज लाखो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. भारतातील बहुतेक शहरे ही रेल्वे लाईनने जोडलेली आहेत. १७७ वर्षे जुनी भारतीय रेल्वे ६८ हजार किलोमीटर परिसरात पसरलेली आहे. IANS च्या अहवालानुसार, भारतीय रेल्वेने दररोज २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवाशांना चांगल्या सेवा- सुविधा देण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. मात्र या नियमांमधील ८ नियम असे आहेत जे प्रवाशांना ठावूक असणे गरजेचे आहे. कारण यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो. त्यामुळे हे ८ नियम कोणते आहेत जाणून घेऊ….

तिकीट काढल्यानंतर प्रवासाचे स्टेशन वाढवता येते का?

ट्रेनने प्रवास करताना तुम्ही ठरवलेल्या स्थानकापर्यंत पोहचल्यानंतर तुम्हाला जर अजून पुढे प्रवास सुरु ठेवण्याचा विचार करत असाल तर तो करु शकता. यासाठी तुम्ही TTE शी संपर्क साधू शकता किंवा IRCTC वरून तिकीट बुक करू शकता. अशावेळी तुम्हाला दुसरी सीट दिली जाऊ शकते

मिडल बर्थसाठीचा नियम

जर तुम्ही मिडल बर्थ बुक केला असेल तर त्यासाठी काही नियम आहेत. मिडल बर्थ रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत खाली करता येत नाही.

ट्रेन चुकली तर सीट आरक्षितचं राहते का?

तुमची ट्रेन जर चुकली असेल आणि तुम्हाला ती ट्रेन दुसऱ्या स्टेशनवरून पकडायची असेल, तर अशावेळी तुमची सीट फक्त २ स्टेशनपर्यंत किंवा १ तासांपर्यंत दुसऱ्या कोणाला दिली जात नाही. परंतु तुम्ही एक तासाने आलाच नाही तर टीटीई ती दुसऱ्याला देऊ शकतात.

टीटीईंसाठी रात्रीचे नियम

रेल्वेच्या नियमांनुसार, टीटीई रात्री १० नंतर प्रवाशांना त्रास देऊ शकत नाही. यासोबतच १० वाजता ट्रेनच्या सर्व लाईटही बंद केल्या जातात.

ट्रेनमध्ये सामानासाठीचे नियम

एसी बोगीमध्ये ७० किलो, स्लीपर कोचमध्ये ४० किलो आणि द्वितीय श्रेणीच्या बोगीमध्ये ३५ किलो वजनापर्यंतचे सामान घेऊन जाता येते. याशिवाय एक्स्ट्रा चार्जसह एसीमध्ये १५० किलो, स्लीपरमध्ये ८० किलो आणि सेकंड क्लास बोगीमध्ये ७० किलो वजनाचे सामान नेण्यास परवानगी आहे.

वेटिंग तिकिटावर प्रवास करण्याचा नियम

जर तुम्ही काउंटरवरून वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करत असाल तर रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्हाला प्रवास करण्यास परवानगी आहे, पण जर तुम्ही ई-तिकीट वेटिंग लिस्टवर प्रवास करत असाल तर प्रवासाची परवानगी नाही.

ट्रेनमधील साखळी ओढण्यासाठीचे नियम

रेल्वेच्या बोगीला जोडलेली साखळी विनाकारण ओढल्यास दंडासह तुरुंगवासाची शिक्षा आहे. कारण काही मोठी इमर्जन्सी असेल तरचं ट्रेनमधील साखळी ओढण्यास परवानगी आहे.

रेल्वे फूडसंबंधीत नियम

रेल्वेने स्नॅक्स, खाद्यपदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांवर नियम केले आहेत. कोणताही विक्रेता तुमच्याकडून जास्त शुल्क घेऊ शकत नाही. यासोबतच जेवणाचा दर्जाही चांगला असायला हवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways made these 8 rules over middle berth timing to waiting ticket journey know more sjr