Indian Railways Refund Rule Changed: भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग दररोज रेल्वेने प्रवास करतो. लांबचा प्रवास येतो तेव्हा लोक भारतीय रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. संपूर्ण भारतभर पसरलेल्या रेल्वे नेटवर्कमुळे, लोकांना जवळपास सर्वच ठिकाणी सहजपणे ट्रेन मिळू शकतात. यासाठी लोक आगाऊ रेल्वे तिकीट बुक करतात, जेणेकरून त्यांना प्रवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. मात्र, काही वेळा काही कारणांमुळे लोकांना प्रवास रद्द करावा लागतो.
अशा परिस्थितीत लोक त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी रेल्वेचे तिकीट रद्द करतात. त्याच वेळी, जर तुम्ही देखील असे करत असाल तर, पैसे कपातीची चिंता करु नका. या प्रवाशांना परतावा मिळतो. रेल्वे उशिरा आल्याने अनेक प्रवाशांच्या गाड्या चुकत आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशाला दुसऱ्या तिकिटासाठी पूर्ण परतावा मिळतो. यासाठी तुम्हालाही रेल्वेचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया कसे मिळतील तुमचे तिकिटांचे पैसे परत.
(हे ही वाचा : तुमचही रेल्वे तिकीट हरवलयं? आता बिनधास्त करा तिकीटाशिवाय प्रवास; जाणून घ्या कसं )
‘असा’ मिळवा परतावा
टीडीआर भरावा लागेल
जर तुमची ट्रेन चुकली असेल तर तुम्ही TDR (तिकीट ठेव पावती-TDR) दाखल करा. चार्टिंग स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर एका तासाच्या आत तुम्ही TDR दाखल करू शकता. प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन TDR दाखल करू शकतात. परताव्यासाठी रेल्वेकडून टीडीआर जारी केला जातो. परताव्याच्या प्रक्रियेस अंदाजे ६० दिवस लागू शकतात.