भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. हे जगातील ८ व्या क्रमांकाचे सर्वात मोठे नोकरीदाता म्हणून देखील ओळखले जाते. देशातील पहिली पॅसेंजर ट्रेन १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? भारतीय रेल्वेशी संबंधित अशा अनेक रंजक गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात लांब नाव असलेले रेल्वे स्थानक..

वेंकटनारसिम्हाराजुवरिपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) हे इतके मोठे नाव आहे की वाचताना जीभही अडखळू शकते. भारतातील सर्व रेल्वे स्थानकांची नावे वेंकटनारसिम्हाराजुवरिपेटा या रेल्वे स्थानकापेक्षा छोटी आहेत. हे रेल्वे स्थानक नावाने खूप प्रसिद्ध आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात २८ अक्षरे आहेत. लहान वाक्ये २८ पेक्षा कमी वर्णांनीच संपतात. यावरून रेल्वे स्थानकाचे नाव किती मोठे आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो. या रेल्वे स्टेशनचे नाव बोलायला सोपे जावे यासाठी लोक त्याला वेंकटनारसिंह राजुवरीपेट या नावानेही संबोधतात. हे स्टेशन आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात तामिळनाडूच्या सीमेवर स्थित आहे.

सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्थानक तुम्हाला माहित आहे का?

आता तुम्हाला देशातील सर्वात मोठे नाव असलेल्या रेल्वे स्टेशनची माहिती झाली असेल. आता आम्ही तुम्हाला देशातील सर्वात लहान नाव असलेल्या रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत. सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन इब (IB) आहे. ओडिशातील झारसुगुडा येथे असलेले ‘इब’ रेल्वे स्थानक फक्त दोन अक्षरांपुरते मर्यादित आहे. ‘इब’ स्टेशन हावडा-नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर स्थित आहे. या स्थानकावर फक्त २ प्लॅटफॉर्म आहेत. यामुळेच या स्थानकावरून फारशा गाड्या जात नाहीत, गाड्यांचा थांबाही केवळ दोन मिनिटांचा आहे.

( हे ही वाचा; डास नेहमी कानाजवळच का गुणगुणतात? यामागचे कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल)

भारतीय रेल्वेशी संबंधित ‘या’ मनोरंजक गोष्टीही जाणून घ्या

  • आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील बोगीबील पूल हा भारतातील सर्वात लांब रेल्वे-रोड पूल आहे.
  • जम्मू आणि काश्मीर दरम्यान हिमालयातील पीर पंजाल प्रदेशात पीर पंजाल रेल्वे बोगदा स्थित आहे, हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे.
  • भारतीय रेल्वेकडे UNESCO-मान्यताप्राप्त चार जागतिक वारसा स्थळे आहेत.
  • ७ रेल्वे मार्ग मथुरा जंक्शनपासून एकाच वेळी उगम पावतात, जे जास्तीत जास्त रेल्वे मार्ग असलेले जंक्शन आहे.
  • भारतीय रेल्वेचे सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक हावडा जंक्शन आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म आहेत.
  • गोरखपूरमध्ये जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे, ज्याची लांबी ४,४८३ फूट आहे.
  • हावडा-अमृतसर एक्स्प्रेसला सर्वाधिक म्हणजेच ११५ थांबा आहेत.
  • जॉन मथाई हे भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते.
  • भारतीय रेल्वे रॉयल राजस्थान ऑन व्हील्स, पॅलेस ऑन व्हील्स, द गोल्डन चेरीयट, महाराजा एक्सप्रेस आणि द डेक्कन ओडिसी या ५ रॉयल ट्रेन्स देखील चालवते.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways the only station in the world whose name can only be read by a few people gps
Show comments