अनेकदा आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जमीन व्यवहाराशी संबंध येतो. शहरामध्ये चौरस फुटमध्ये मोजली जाणारी जमीन ग्रामीण भागांमध्ये सामान्यपणे एकर, गुंठा, हेक्टरमध्ये मोजली जाते. अशावेळी अनेकांना गोंधळायला होतं. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शेत जमीनीसंदर्भातील मोजमापांबद्दल… चला तर मग जाणून घेऊयात एकर आणि गुंठे आणि हेक्टर चौरस फुट आणि मीटरमध्ये किती असतात याबद्दल…
१ आर = १ गुंठा
आणखी वाचा
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ हेक्टर = १०० आर म्हणजेच १०० गुंठे
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ चौ. मी. = १०.७६ चौ फुट
वरील तक्ता वाचून तुमच्या बऱ्याचश्या शंकांचे निरसन झाले असेल. नाही का?