Instagram: गेल्या काही वर्षांमध्ये इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खास करुन तरुण मंडळी इन्स्टाग्रामचा वापर अन्य अ‍ॅप्सपेक्षा जास्त करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. मेटा कंपनीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर इन्स्टाग्राममध्ये अनेक बदल करण्यात आले. फोटो, व्हिडीओ, लाइव्ह यांच्याव्यतिरिक्त रिल्स हे नवे फीचर इन्स्टाग्रामद्वारे लॉन्च करण्यात आले. यूट्यूबर, फेसबुक या माध्यमांवर अ‍ॅक्टिव्ह असणारे लोक इन्स्टाग्रामकडे वळायला सुरुवात झाली.

करोना काळात लोक मनोरंजनासाठी इन्स्टाग्रामचा वापर करु लागले. दरम्यानच्या काळात कन्टेंट क्रिएटर्स इन्स्टाग्रामवर व्हिडीओ, फोटो असा त्यांचा कन्टेंट पोस्ट करु लागले. छोट्या व्यापाऱ्यांपासून ते मोठमोठ्या कंपन्या या माध्यमाद्वारे आपले प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. इन्स्टाग्रामवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे असल्यास तुमचे अकाउंट प्रोफेशनल असणे आवश्यक आहे. प्रोफेशनल इन्स्टाग्राम अकाउंटचे असंख्य फायदे आहेत. यामुळे इनसाइड्स, बूस्टिंग यांसारख्या सुविधांचा वापर करता येतो.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

इन्स्टाग्राम अकाउंट स्विच करुन प्रोफेशनल अकाउंट बनवण्यासाठी फॉलो करा पुढील स्टेप्स –

  • स्मार्टफोनवरील इन्स्टाग्राम अ‍ॅप सुरु करा. उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात प्रोफाइल फोटो दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला वरच्या दिशेला तीन आडव्या पट्ट्या दिसतील. त्यावर क्लिक करुन Settings & privacy ऑप्शन निवडा.
  • त्यामध्ये तुम्हाला Account type and tools असे लिहिलेले दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • पुढे Switch to professional account या ऑप्शनवर क्लिक करा.

आणखी वाचा – Instagram च्या पर्सनल आणि प्रोफेशनल अकाउंट्समध्ये काय फरक असतो? जाणून घ्या…

वरील स्टेप्स फॉलो करुन तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट प्रोफेशनल मोडमध्ये स्विच होईल. इन्स्टाग्राममध्ये पर्सनल, प्रोफेशनल आणि क्रिएटर असे अकाउंट्सचे तीन प्रकार असतात. आपल्याकडे यातील पर्सनल, प्रोफेशनल इन्स्टाग्राम अकाउंट्स पाहायला मिळतात.

Story img Loader